बीड जिल्ह्यात पाच नगरपंचायतसाठी दीड वाजेपर्यंत 52.69 टक्के मतदान

बीड जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीची निवडणूक होऊ घातलीये. यासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
बीड जिल्ह्यात पाच नगरपंचायतसाठी दीड वाजेपर्यंत 52.69 टक्के मतदान
बीड जिल्ह्यात पाच नगरपंचायतसाठी दीड वाजेपर्यंत 52.69 टक्के मतदानSaam Tv
Published On

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीची निवडणूक (Elections) होऊ घातलीये. यासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. आज दीड वाजेपर्यंत 5 नगर पंचायतीमध्ये 52.69 टक्के मतदान (Voting) झाले आहे. यामध्ये एकूण 46 हजार 533 मतदारांपैकी 24 हजार 520 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. - 52.69 percent voting for five Nagar Panchayats in Beed district till 1.30 pm

नेमकं कोणत्या नगरपंचायतीमध्ये किती मतदार आहे आणि त्यापैकी किती जणांनी आतापर्यंत मतदानाचा हक्क बजावला आहे जाणून घेऊ -

- केज नगरपंचायत - 16,741 एकूण मतदार आहेत. त्यापैकी 7,580 जणांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

- आष्टी नगरपंचायत - 7,004 एकूण मतदार आहेत. त्यापैकी 3,688 जणांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

- पाटोदा नगरपंचायत - 10,072 एकूण मतदार आहेत. त्यापैकी 5,413 जणांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

हेही वाचा -

बीड जिल्ह्यात पाच नगरपंचायतसाठी दीड वाजेपर्यंत 52.69 टक्के मतदान
भंडारा जिल्हा परिषदेच्या 39, पंचायत समितीच्या 79 निर्वाचक जागांसाठी मतदान

- वडवणी नगरपंचायत - 8,988 एकूण मतदार आहेत. त्यापैकी 5,626 जणांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

- शिरुर कासार नगरपंचायत - 3,728 एकूण मतदार आहेत. त्यापैकी 2,213 जणांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

- दरम्यान, सायंकाळी 5:30 पर्यंत मतदानासाठी वेळ असून 65 जागांसाठी 260 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com