भंडारा जिल्हा परिषदेच्या 39, पंचायत समितीच्या 79 निर्वाचक जागांसाठी मतदान

भंडारा जिल्हा परिषदेच्या 39 तर पंचायत समितीच्या 79 निर्वाचक जागांसाठी मतदान होत आहे.
भंडारा जिल्हा परिषदेच्या 39, पंचायत समितीच्या 79 निर्वाचक जागांसाठी मतदान
भंडारा जिल्हा परिषदेच्या 39, पंचायत समितीच्या 79 निर्वाचक जागांसाठी मतदान SaamTV
Published On

रश्मी पुराणिक -

भंडारा : भंडारा जिल्हा परिषदेच्या 39 तर पंचायत समितीच्या 79 निर्वाचक जागांसाठी मतदान होत आहे. एकूण 7 लाख 68 हजार 866 मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत. भंडाऱ्यात 1,322 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. एकूण 7 लाख 68 हजार 866 मतदार मतदान करतील. त्यापैकी 3 लाख 89 हजार 130 पुरुष, तर 3 लाख 79 हजार 736 महिला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. - Bhandara Local Governance Body Elections Voting for 39 Zilla Parishad and 79 Panchayat Samiti constituencies

जिल्हा परिषदेसाठी एकूण 245 उमेदवार नशिब आजमावत असून पंचायत समितीसाठी 417 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेच्या 245 उमेदवारांपैकी 109 स्त्री तर 136 पुरुष उमेदवार आहेत. पंचायत समितीसाठी 417 उमेदवारांपैकी 228 पुरुष तर 189 स्त्री उमेदवार आहेत.

हेही वाचा -

भंडारा जिल्हा परिषदेच्या 39, पंचायत समितीच्या 79 निर्वाचक जागांसाठी मतदान
नाशिक जिल्ह्यात 6 नगर पंचायतीच्या 87 जागांसाठी उद्या निवडणूक; कोण मारणार बाजी ?

राज्य सरकारचा प्रस्ताव फेटाळून ठरलेल्या वेळेतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने (Election Commission) घेतला होता. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार, 2 जिल्हा परिषद आणि 105 नगरपंचायतींमधील निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच (OBC Reservation) होत आहेत. 19 जानेवारी 2022 ला मतमोजणी होणार आहेत. तर 18 जानेवारी 2022 ला ओबीसी आरक्षित जागेतील निवडणुका पार पडणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com