नवनीत तापडिया
Chhatrapati Sambhaji Nagar News: वाळूज औद्योगिक परिसरातील बजाजनगरातील एका मॉलमध्ये मुदत संपलेल्या 45 रुपयांच्या चॉकलेटची अवघ्या 10 रुपयांत विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे हे चॉकलेट खाल्ल्याने 50 ते 60 मुलांना मळमळ, चक्कर आल्यामुळे त्यांना दवाखान्यात दाखल करावे लागले. (Latest Marathi News)
हा सर्व प्रकार लक्षात येताच पालकांनी मॉलमध्ये (Mall) धाव घेत व्यवस्थापकांना जाब विचारत धारेवर धरले. प्रकरण वाढत असल्याने पालकांनी 112 क्रमांकावर कॉल केला. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी अन्न-औषध प्रशासन विभागाकडे तक्रार करण्याची सूचना केल्यानंतर पालक घरी परतले. याप्रकरणी मॉलच्या विरोधात अन्न-औषध प्रशासनाकडे तक्रार दिल्याची माहिती स्थानिकांनी दिली. तर या सर्व मुलांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
स्टिकर हटवताच चॉकलेटची मुदत दिसली
पालकांसोबत मॉलमध्ये गेलेल्या एका मुलाने ऑफरमध्ये चॉकलेट खरेदी केले. त्यानंतर त्याने ही बाब आपल्या इतर मित्राला सांगितली. पालकांनी घेऊन दिलेल्या पॉकेटमनीतून त्या मित्रानेही दोन चॉकलेट (Chocolate) खरेदी केले. दुकानाबाहेर येताच त्याने एक चॉकलेट खाल्ले.
त्यानंतर त्या मुलाला मळमळ व चक्कर येऊ लागली. मुलाने चॉकलेटच्या वरचे ऑफरचे स्टिकर बाजूला करत त्याची मुदत तारीख तपासून बघितली. तेव्हा त्या चॉकलेटची मुदत २५ जून २०२३ रोजीच संपलेली होती. त्याने घरी गेल्यावर घडलेला प्रकार पालकांना सांगितला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.