राष्ट्रवादीला जबर धक्का, संदीप क्षीरसागरांचे 5 खंदेसमर्थक शिवसेनेत दाखल

शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर आणि राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर या काका पुतण्यांचा राजकीय वाद काही नवीन नाहीये.
Beed Politics
Beed Politics Saam TV
Published On

बीड: शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर आणि राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर या काका पुतण्यांचा राजकीय वाद काही नवीन नाहीये. मात्र आगामी निवडणुकीच्या तोंडावर काका जयदत्त क्षीरसागर हे पुन्हा सक्रिय झाले आहेत. आमदार संदीप क्षीरसागर यांचे पाच खांदे समर्थक काकांनी फोडले असून आज त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश करून घेतला आहे.

फारूक पटेल यांच्यासह तब्बल पाच शिलेदार फुटल्याने संदीप क्षीरसागर यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख आनंद जाधव यांच्या उपस्थितीत पाच जणांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश झालाय. नगरसेवक अमर नाईकवाडे, फारूक पटेल, राष्ट्रवादी नेते नितीन लोढा, गंगाधर घुमरे, बाबूशेठ लोढा यांनी आज राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करीत शिवबंधन हातात बांधून घेतले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com