अलिबाग वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४०६ कोटी रुपये निधी मंजूर - तटकरे

२०१० मध्ये राज्यसरकारने रायगड जिल्ह्यात अलिबाग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास मंजुरी दिली होती. मात्र तांत्रिक कारणामुळे हे वैद्यकीय महाविद्यालय सुरु होऊ शकले नव्हते.
अलिबाग शासकीय महाविद्यालयासाठी ४०६ कोटी रुपये निधी मंजूर - तटकरे
अलिबाग शासकीय महाविद्यालयासाठी ४०६ कोटी रुपये निधी मंजूर - तटकरे SaamTv
Published On

राजेश भोस्तेकर

रायगड : अलिबाग येथील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी राज्यसरकारने ४०६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणाऱ्या बहूतांश सुविधांची पुर्तता राज्यसरकारने केली आहे. केंद्रीय पथकाच्या पाहणी नंतर लवकरच या वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळेल असा विश्वास रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला. त्या अलिबाग येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या. 406 crore sanctioned for Alibag Government Medical College - Tatkare

२०१० मध्ये राज्यसरकारने रायगड जिल्ह्यात अलिबाग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास मंजुरी दिली होती. मात्र तांत्रिक कारणामुळे हे वैद्यकीय महाविद्यालय सुरु होऊ शकले नव्हते. मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा एकदा अलिबाग येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरु व्हावे यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. अलिबाग तालुक्यातील उसर येथील ५३ एकर जमिन प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयासाठी हस्तांतरीत करण्यात आली आहे.

हे देखील पहा -

यासाठी उद्योग विभागाने एमआयडीसीच्या ताब्यातील २३ एकर जागा उपलब्ध दिली आहे. आता या जागेवर १०० विद्यार्थी क्षमता असलेले महाविद्यालय, ५०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय, प्रशासकीय इमारत आणि विद्यार्थ्यांसाठी ह़ॉस्टेलची उभारणी केली जाणार आहे. यासाठी राज्यसरकारने ४०६ कोटी रुपयांची तरतूद केली असून तसे आदेशही काढण्यात आल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी यावेळीसांगितले.

आरसीएफ कॉलनी कुरुळ येथील सहा इमारती आणि शाळेची जुनी वास्तु तीन वर्षासाठी वैद्यकीय महाविद्यालयासाठी आरसीएफ कंपनी मार्फत मोफत उपलब्ध करून दिली आहे. या इमरतींच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. या शिवाय जिल्हा रुग्णालयात १५ कोटी रुपये खर्चून लेक्चर हॉल, प्रशासकीय इमारत आणि प्रयोगशाळा इमारत बांधली जात आहे. या इमारतीचे बांधकाम सप्टेंबर अखेर पर्यंत पुर्ण होणं अपेक्षित आहे.

अलिबाग शासकीय महाविद्यालयासाठी ४०६ कोटी रुपये निधी मंजूर - तटकरे
हृदयद्रावक! पतीच्या विरहाने पत्नीनेही सोडला प्राण

महाविद्यालयासाठी ४० पदे भरण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे अलिबाग येथे तातडीने वैद्यकीय महाविद्यालय सुरु करता यावे यासाठी आवश्यक बहुतांश गोष्टींची पुर्तता राज्यसरकारने केली आहे. केंद्रीय पथकाच्या पाहणी नंतर अलिबाग येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरु होऊ शकेल असा विश्वास तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

उसर येथे वैद्यकीय महविद्यालयाचे बांधकाम करूनही बरीच जागा शिल्लक राहणार आहे. या ठिकाणी आयुर्वेद महाविद्यालय सुरु करण्यासाठी आगामी काळात प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. उसर येथील महाविद्यालयाचे काम पुर्ण झल्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या इमारती जिल्हा रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी वापरल्या जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com