Gondia News: हळहळ! एकाला वाचवायला विहिरीत उतरले, चौघांनीही गमावला जीव; नेमकं काय घडलं?

4 people dead after fell in well: गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील सरांडी गावात ही घटना घडली आहे.
Gondia Crime News
Gondia Crime NewsSaam Tv
Published On

Gondia News: गोंदियामध्ये (Gondia) धक्कादायक घटना घडली आहे. विहिरीमध्ये मोटार पंप (Motor Pump) दुरुस्त करत असताना विजेचा धक्का लागल्यामुळे चौघांचा दुर्दैवी मृ्त्यू झाला आहे. एकाचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात चौघांनी आपला जीव गमावला आहे. गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील सरांडी गावात ही घटना घडली आहे. मृतांमध्ये खेमराज साठवणे, सचिन भोंगाडे, महेंद्र राऊत आणि प्रकाश भोंगाडे यांचा समावेश आहे. या घटनेमुळे सरांडी गावावर शोककळा पसरली आहे.

Gondia Crime News
Pune Koyta Attack News Update: पुण्यात तरुणीवर कोयता हल्ला प्रकरण, आरोपीची पोलीस कोठडीत रवानगी

मिळालेल्या माहितीनुसार, सरांडी गावामध्ये राहणाऱ्या खेमराज साठवणे हे आपल्या घरगुती विहिरीतील मोटार पंप बंद पडल्यामुळे दुरुस्तीसाठी विहिरीमध्ये उतरले होते. दुरुस्तीचे काम करत असताना अचानक वीज प्रवाह सुरु झाला आणि त्यांना विजेचा धक्का लागला. त्यानंतर ते विहिरीमध्ये पडले. बराच वेळ ते विहिरीबाहेर न आल्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी सचिन भोंगाडे आणि प्रकाश भोंगाडे हे काका-पुतणे विहिरीमध्ये उतरले. तर त्यांना देखील विजेचा धक्का लागला आणि ते देखील विहिरीत पडले.

Gondia Crime News
NASA Warns Solar Storm: आपल्याला काही महिने इंटरनेटशिवाय राहावे लगणार? नासाकडून मोठ्या सौर वादळाचा इशारा

यांचा आरडाओरडा ऐकून शेजीर राहणाऱ्या महेंद्र राऊत यांनी विहिरीकडे धाव घेतली आणि या तिघांना वाचवण्यासाठी ते देखील विहिरीमध्ये उतरले. तर त्यांना देखील विजेचा धक्का लागला आणि ते विहिरीमध्ये पडले. या घटनेत चौघांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती पसरल्यानंतर विहिरीजवळ गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली.

विजेचा धक्का लागूनच या चौघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. चौघांचे देखील मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेमुळे चौघांच्या देखील कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. एकाच दिवशी गावातील चौघांचा मृत्यू झाल्यामुळे सरांडी गावावर शोककळा पसरली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com