Gondia News: भारतीय लष्काराच्या ३० वर्षीय जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; गावावर शोककळा

Gondia News: भारताच्या सेवेसाठी लेह-लडाखमध्ये भारतीय सैन्य दलात कर्तव्यावर असलेल्या 30 वर्षीय जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Gondia News: भारतीय लष्काराच्या ३० वर्षीय जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; गावावर शोककळा
Published On

Gondia News In marathi

भारताच्या सेवेसाठी लेह-लडाखमध्ये भारतीय सैन्य दलात कर्तव्यावर असलेल्या 30 वर्षीय जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुरेश हुकलाल नागपुरे असं मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे. सुरेश नागपुरे हे गोंदिया जिल्ह्यातील तुमखेडा येथील रहिवाशी होते. (Latest Marathi News)

गोंदियातील ३० वर्षीय जवान सुरेश नागपुरे हे लेह-लडाखमधील शून्याखाली गेलेल्या तापमानात सेवा बजावताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे.

सुरेश हुकलाल नागपुरे हे तुमखेडा खुर्द, गोंदियाचे रहिवाशी होते. सुरेश नागपुरे यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Gondia News: भारतीय लष्काराच्या ३० वर्षीय जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; गावावर शोककळा
Uddhav Thackeray: सरकार आपल्या दारी आणि दुष्काळ आपल्या उरावरी; उद्धव ठाकरेंचा नगरमधून शिंदे सरकारवर घणाघात

या घटनेची माहिती मिळताच तुमखेडासह तालुक्यात एकच शोककळा पसरली आहे. सुरेश नागपुरे यांचे मृतदेह आज सायंकाळपर्यंत वीर जवानाचे पार्थिव त्यांच्या मुळगावी पोहोचणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश नागपुरे हे लेह लडाखमध्ये कर्तव्य बजावत होते. सुरेश हे कर्तव्य बजावत असतानाच बुधवारी संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. यामुळे सुरेश नागपुरे यांचा मृत्यू झाला.

Gondia News: भारतीय लष्काराच्या ३० वर्षीय जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; गावावर शोककळा
Pune Metro Video: पुण्यात दोन मेट्रो अचानक समोरासमोर आल्या; प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ, पुढे काय घडलं?

सुरेश नागपुरे यांचा मृतदेह ८ सप्टेंबर रोजी तुमखेडा खुर्द येथे आणण्यात येणार आहे. यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमातात अंत्यसंस्कार करण्यात येईल. सुरेश नागपुरे यांच्या मागे पत्नी, पाच महिन्याची मुलगी, आई-वडील, दोन भाऊ असं कुटुंब आहे. त्यांच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे. (Gondia Latest News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com