Today's Marathi News Live: 10 वीचा पेपर सुरू असताना गुंडांचा हैदोस; शिक्षकांसमोर कॉपी पुरवणाऱ्या टोळक्याचा Video व्हायरल

Maharashtra Latest News and Update in Marathi (26 March 2024): राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांना संक्षिप्त आढावा.
Live News of on Kejriwal, Mahavikas Aghadi Seat Sharing, Congress Candidate List, Loksabha Election 2024 and Overall Maharashtra by Saam TV News
Live News of on Kejriwal, Mahavikas Aghadi Seat Sharing, Congress Candidate List, Loksabha Election 2024 and Overall Maharashtra by Saam TV NewsSaam Tv

10 वीचा पेपर सुरू असताना गुंडांचा हैदोस; शिक्षकांसमोर कॉपी पुरवणाऱ्या टोळक्याचा Video व्हायरल

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे 10 वीचा भूगोलाचा पेपर सुरू असतांना परिसरातील गुंड प्रवृत्तीच्या टोळक्यांनी खाजगी विद्यालयात प्रवेश केला. आणि चक्क शिक्षकासमोर विद्यार्थ्यांना कॉपी पुरविण्याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरलं झाला आहे.

साईट न दिल्याने टेम्पो चालकाने दुचाकीस्वारावर कोयत्याने केले वार

पुणे जिल्हातील हवेली तालुक्यातील तिर्थक्षेत्र थेऊर येथील मुळा मुठा नदीच्या पुलावर टेम्पोला एका दुचाकीस्वाराने साईट दिली नाही. त्या रागातून टेम्पो चालकाने एका दुचाकीस्वाराला टेम्पो आडवा लाऊन भरदिवसा कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

त्यावेळी मी ३५ दिवसात खासदार झालो; आढळराव पाटील यांनी दिला शिवसेनेतील आठवणींना उजाळा

दिलीप वळसे आणि माझे सलोख्याचे संबंध होते. मात्र राजकारणात महत्वकांक्षा वाढते. यातून आमच्यात वाद झाले. मात्र आम्ही कधी ही एकमेकांवर वैयक्तिक कोणते ही भाष्य केले नाही. 2004 साली मी लोकसभेत आणि दिलीप वळसे यांनी विधानसभेत उभं राहायचं ठरलं. त्यावेळी मला शिवसेनेकडून उभं राहण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी ऑफर दिली. मी 35 दिवसांत खासदार झालो. बाळासाहेबांनी विश्वास दाखवल्यानं मी खासदार होऊ शकलो. पहिली निवडणूक ही न विसरणारी आहे. 2009 साली मतदारसंघाची नव्यानं निर्मिती झाली.

नाशिकच्या मालेगावमध्ये तापमानाचा पारा 41 अंशावर

नाशिकच्या मालेगावमध्ये तापमानाचा पारा 41 अंशावर स्थिरावला. जिल्ह्यातील अनेक शहरांचे तापमान 37 ते 38 अंश, येत्या काही दिवसात मालेगावच्या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Lok Sabha Election : शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह २०० जणांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

प्रमुख पदाधिकाऱ्यांसह २०० जणांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

अजित पवार यांनी आढळराव-पाटील यांचं पक्षात केलं स्वागत

सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, रुपाली चाकणकर यांची उपस्थिती

Maharashtra Lok Sabha Election : चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांचा लोकसभेसाठी अर्ज दाखल

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून आज भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अर्ज दाखल केला.

केजरीवालांच्या अटकेविरुद्ध याचिकेवर उद्या दिल्ली हायकोर्टात सुनावणी

नवी दिल्ली :

अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्याचा निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी

दिल्ली उच्च न्यायालयात उद्या सकाळी होणार सुनावणी

केजरीवाल यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. ते सध्या ईडीच्या कोठडीत आहेत

शिवसेनेचा दक्षिण मुंबई, ठाणे, शिर्डी आणि नाशिकवर दावा कायम

इच्छुक उमेदवारांची नावे भाजपकडे पाठवली

शिवसेनेकडून दक्षिण मुंबई, ठाणे, शिर्डी आणि नाशिक या मतदारसंघावर दावा

या चारही जागांवर महायुतीमध्ये चर्चा सुरू आहे.

शिवसेनेने दक्षिण मुंबई, ठाणे, शिर्डी आणि नाशिक या चार जागांवरील इच्छुक उमेदवारांची नावे भाजपकडे पाठवल्याची माहिती शिवसेनेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

रायगडचा तिढा सुटला, सुनील तटकरे यांना उमेदवारी; अजित पवारांची घोषणा

Maharashtra Loksabha :

लोकसभेच्या रायगड मतदारसंघात महायुतीमध्ये प्रचंड चढाओढ सुरू होती. अखेर हा तिढा सुटला आहे. रायगडमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील तटकरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. अजित पवार यांनी स्वतः पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

गडचिरोलीत महायुतीचे जोरदार शक्तिप्रदर्शन

गडचिरोली :

थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे गडचिरोलीत

महायुतीचे उमेदवार अशोक नेते आज उमेदवारी अर्ज भरणार

महायुतीकडून गडचिरोलीत जोरदार शक्तिप्रदर्शन

शरद पवार यांच्या भेटीला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात

तीन जागांवरून अजूनही महाविकास आघाडीत तिढा कायम

भिवंडी, इशान्य मुंबई, सांगली जागेवरून तिढा कायम

पवारांच्या मध्यस्थीवर महाविकास आघाडीचं भविष्य?

छगन भुजबळ नाशिकमधून लोकसभा लढवणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची नाशिक मतदारसंघातून उमेदवारी जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती

भुजबळ हे महायुतीकडून लोकसभा लढवण्याची शक्यता

भुजबळ नाशिकमधून घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचे संकेत

श्रीगुरू पादुका दर्शन सोहळ्याला महिलांची मोठी गर्दी, अभंगही गायला

वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये श्रीगुरू पादुका दर्शन सोहळा पार पडतोय. या सोहळ्याला वारकरी मंडळींसह महिला भाविकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. महिलांनी अप्रतिम अभंग देखील सादर केला.

समाजाची घट्ट बांधणी संतांमुळे...; मनोज जोशींनी घेतलं श्रीगुरू पादुकांचं दर्शन

सकाळ माध्यम समूहाने आयोजित केलेल्या श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. नवी मुंबईच्या वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये सुरू झालेल्या या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांनी संत-महात्म्यांच्या पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी नामस्मरण आणि भक्तिमार्गाचं महत्व सांगितलं. समाजाची घट्ट बांधणी ही संत परंपरेमुळे झाली असल्याचंही ते म्हणाले.

महायुतीत ठाणे, रत्नागिरी आणि पालघरचा तिढा सुटला?

ठाण्याची जागा शिवसेना लढवणार

राजन विचारेंच्या विरोधात रवी फाटक याचं नाव जवळपास निश्चित

रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजप लढवणार

रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेसाठी राणेंच्या नावाची चर्चा

तर पालघरच्या जागेवर भाजपचा दावा कायम

- सूरज सावंत, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबईत मुलुंडमध्ये इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग

मुलुंडच्या एलबीएस मार्गावर असलेल्या एव्हीआर कॉर्पोरेट पार्कमध्ये आज सकाळच्या सुमारास आग लागली. या बिझनेस पार्कच्या सहाव्या माळ्यावर आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे सहा बंब घटनास्थळी नेण्यात आले. बिझनेस पार्कमध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका केली. सकाळची वेळ असल्यामुळे या बिझनेस पार्कमध्ये नागरिकांची फारशी वर्दळ नव्हती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उद्या जाहीर होणार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उद्या दुपारी ३ वाजता जाहीर होणार

मुंबईत एकत्रितरित्या पत्रकार परिषद घेत उमेदवार जाहीर केले जाण्याची शक्यता

मातोश्रीवर पार पडलेल्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बैठकीत एकमुखाने निर्णय

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची उद्या दुपारी एक वाजता बैठक पार पडेल आणि त्यानंतर एकत्रित पत्रकार परिषदेत उमेदवार घोषित करण्यात येणार

अजूनही सांगली, भिवंडी आणि ईशान्य मुंबई लोकसभेचा तिढा कायम, सूत्रांची माहिती

पादुका दर्शन सोहळा : १८ संत-महात्म्यांच्या पादुका दर्शनासाठी कार्यक्रमस्थळी पोहोचल्या 

पादुका दर्शन सोहळा : १८ संत-महात्म्यांच्या पादुका पोहोचल्या कार्यक्रमस्थळी दर्शनासाठी आणल्या

भाविकांची पादुका दर्शनासाठी रीघ

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘श्री फॅमिली गाइड प्रोग्रॅम’च्या माध्यमातून २६ मार्च आणि २७ मार्च दोन कार्यक्रम

नवी मुंबईतीली वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे कार्यक्रम

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची उमेदवारांची यादी आज संध्याकाळपर्यंत जाहीर होणार

सांगलीच्या जागेवर शिवसेनेची दावेदारी तर भिवंडीच्या जागेवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस चर्चा करतील संजय राऊत यांची माहिती

अनिल देसाई यांचे स्वीय सहायक दिनेश बोभाटे यांना ईडीचे समन्स

अनिल देसाई यांचे स्वीय सहायक दिनेश बोभाटे यांना ईडीचे समन्स

मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीचे बोभाटे यांना समन्स

सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने दाखल केलाय गुन्हा

मूळ मिळकतीपेक्षा ३६ टक्के ज्यादा बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा आरोप

बोभाटे हे न्यू इंडिया अॅश्युरन्स कार्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत असिस्टंट ते सीनियर असिस्टंट पदावर कार्यरत होते

बोभाटे यांच्यासह त्यांच्या पत्नीलाही या गुन्ह्यात आरोपी बनवण्यात आलंय

महादेव जानकर महायुतीचे परभणी लोकसभेचे उमेदवार असतील, सूत्रांची माहिती  

महादेव जानकर महायुतीचे परभणी लोकसभेचे उमेदवार, सूत्रांची‌ माहिती‌

बारामतीत सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या उमेदवार - सूत्र

जानकर घड्याळ की कमळ चिन्ह घेऊन निवडणुक लढणार यावर आज निर्णय - सूत्र

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील केर्ली इथं एका गोडाऊनला भीषण आग

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील केर्ली इथं एका गोडाऊनला भीषण आग लागली.

रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गाचे काम चालू आहे. त्यासाठी लागणारे साहित्य केर्ली परिसरातील गोडाऊनमध्ये साठवण्यात आले होते.

अचानक या गोडाऊनला भीषण आग लागली. गोडाऊनमधील साहित्य जळून खाक झाले आहे.

अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवले आहे. आगीत 15 ते 20 लाखांचं साहित्य जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती

नाशिक शहरातील अनेक भागात उद्या बुधवारी आणि गुरुवारी पाणीबाणी

नाशिक शहरातील अनेक भागात उद्या बुधवारी आणि गुरुवारी पाणीबाणी

शहरातील १२ प्रभागांमध्ये उद्या पाणी पुरवठा राहणार बंद

सातपूर, सिडको आणि नाशिक पश्चिम विभागातील १२ प्रभागांमध्ये पाणीपुरवठा राहणार बंद

तर गुरुवारी सकाळी देखील कमी दाबाने होणार पाणीपुरवठा

शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्रात यांत्रिकी आणि अन्य दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा राहणार बंद

दोन दिवस पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं पालिका प्रशासनाचं आवाहन 

पुण्यात बाणेरमधील डॉक्टरची एक कोटीची फसवणूक

परदेशात पाठवलेल्या कुरिअरमध्ये अमली पदार्थ,परदेशी चलन सापडल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी बाणेर परिसरातील एका डॉक्टरची सुमारे एक कोटी रुपयांची फसवणूक केली.हा प्रकार शिवाजीनगर भागातील क्लिनिकमध्ये घडला.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १९.७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १९.७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाची कारवाई

नैरोबी वरून आलेल्या महिला प्रवाश्याकडून १.९७९ किलो कोकेन जप्त

महिला सिएरा लिओनीची नागरिक

बूट, शॅम्पू बॉटलमध्ये लपवण्यात आले होत कोकेन

Mumbai News : वाकोल्यात बापानेच मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना सामोर

वाकोल्यात बापानेच मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना सामोर

वाकोलाच्या दत्तमंदीररोड वाघरीपाडा येथे आरोपी दिनेश गुप्ता आपल्या कुटुंबासोबत रहात होते

रविवारी रात्री गुप्ता यांचे मुलगा आलोक गुप्ता १७ याच्यासोबत वाद झाला

याच वादात राग अनावर झालेल्या वडिल दिनेश यांनी किचनवरील चाकूने आलोकवर हल्ला केला

या हल्यात आलोकच्या पोटाला गंभीर दुखापत झाली. आलोकला पुढील उपचारासाठी जवळील व्हि एन देसाई रुग्णालयात नेहले

मात्र उपचारा दरम्यान आलोकचा मृत्यू झाला. या प्रकरणी वाकोला पोलिस ठाण्यात मुलाच्याच हत्ये प्रकरणी दिनेश गुप्ता याच्यावर गुन्हा दाखल करून त्याल पोलिसांनी अटक केली आ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com