Maharashtra Politics : महाविकास आघाडीचे 20 ते 22 आमदार संपर्कात; शिंदे-फडणवीस सरकारमधील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

आमदार बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीचे काही आमदार माझ्यासोबत असल्याचा दावा केल्यानंतर शिंदे- फडणवीस सरकारमधील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट.
Eknath shinde And Devendra fadnavis
Eknath shinde And Devendra fadnavisSaam TV
Published On

Maharashtra Politics Latest Update : आमदार बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीचे काही आमदार माझ्यासोबत असल्याचा दावा केल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारमधील उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Eknath shinde And Devendra fadnavis
Ravikant Tupkar: रविकांत तुपकरांसह १८ जणांवर दंगलीचे गुन्हे दाखल, बुलडाण्यातील शेतकरी आंदोलन चिघळल्याप्रकरणी कारवाई

आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu)यांच्याकडे दहा ते बारा आमदारांची यादी आहे तर माझ्याकडेही दहा ते बारा आमदारांची यादी आली आहे. लवकरच महाविकास आघाडीचे 20 ते 25 आमदार आमच्या सोबत येतील असा दावा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला आहे.

उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) रात्री माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे कुस्तीच्या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचे ‌ 20 ते 22 आमदारआमदार लवकरच बाहेर पडतील असा मोठा गौप्यस्फोट केला आहे.

राजकारण्यांनी देखील कुस्तीप्रमाणं खिलाडूवृत्ती शिकावी असेही सामंत म्हणाले. यापुढं येणारे महापालिकेचं मैदान असो लोकसभेचे असो अथवा विधानसभेचे सर्व कुस्त्या शिंदे-फडणवीस जिंकू असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.

Eknath shinde And Devendra fadnavis
China News : चीनी सरकारकडून विद्यार्थ्यांना शुक्राणू दान करण्याची विनंती; बदल्यात मिळत आहे मोठी रक्कम; काय आहे कारण?

अलीकडेच आमदार बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीमधील 10 ते 12 आमदार माझ्या संपर्कात आहेत म्हटले आहे यावर सामंत यांना विचारले असता त्यांनी माझ्या संपर्कात आहेत तर 8 ते 10 व बच्चू कडू असे मिळून 20 ते 22 आमदार आमच्या सोबत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, शिंदे गटाचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत उपस्थित होते. यावेळी सांमत बोलत असताना वीज तोडणीवर बोला, असे ओरडत सामंतांच्या भाषणावेळी उपस्थितांनी‌ गोंधळ घातला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com