

शिर्डी : दोन व्यक्तींचे मृतदेह रस्त्याच्याकडेला आढळल्यामुळे मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. मागील २ दिवसांपासून शिर्डीमध्ये कोसळत असलेला पाऊस आणि जाणवत असलेल्या थंडीमुळे या दोन्ही व्यक्तींचा गारठून मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृतांपैकी एकाची ओळख पटली असून दुसऱ्याची ओळख पटविण्याचे काम पोलीस करत आहेत.
हे देखील पहा-
शिर्डीमधील नगर- मनमाड महामार्गावर एक आणि कणकुरी रोडवर लगत असलेल्या ओढ्याजवळ एक अशा २ ठिकाणी २ व्यक्तीचे मृतदेह आढळल्याची माहिती शिर्डी पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करुन, मृतदेह ताब्यात घेतले आहे. एका मृतदेहाजवळ काही आधार कार्ड आणि दवाखान्याची काही कागदपत्रे आढळली असून त्यावरून एकनाथ हाटे (रा. कल्याण), अशी एकाची ओळख पटली आहे. शिर्डी पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे.
एकनाथ हाटे यांच्याकडे मिळवून आलेल्या कागदपत्रावरून त्यांचा कुटूंबियांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरा व्यक्ती हा शिर्डीत भिक्षेकरू म्हणून राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील २ दिवसांपासून शिर्डीत थंडी आणि रिमझीम पाऊस असल्यामुळे शिर्डीमधील भिक्षेकरुंना निवारा नसल्याने ते थंडीत गारठून जात आहेत. यामध्ये वयोवृद्ध भिक्षेकरुंना शिर्डीतील प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते अनाथालयात नेऊन तिथे त्यांची व्यवस्था करण्यात येत आहेत.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.