Parbhani: पाणीबाणीची स्थिती, निम्न दुधना प्रकल्पात फक्त २ टक्केच पाणीसाठा;कौसडीत भीषण पाणीटंचाई

Parbhani Latest Marathi News : जालना जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्यानंतर सेलूच्या निम्न दुधना प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत असते.
2 percent water level remain in nimna dudhana project
2 percent water level remain in nimna dudhana projectSaam Digital
Published On

परभणी, जालना जिल्ह्यातील अनेक गावांची तहान भागविणाऱ्या सेलूच्या निम्न दुधना प्रकल्पाची मृतसाठयाकडे वाटचाल सुरू आहे. या प्रकल्पात केवळ दोन टक्के जलसाठा शिल्लक असल्याने अनेक गावांची चिंता वाढली आहे. पाच वर्षांनंतर प्रथमच प्रकल्प मृत साठ्याकडे वाटचाल करीत आहे. (Maharashtra News)

जालना जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्यानंतर सेलूच्या निम्न दुधना प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत असते. गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने निम्न दुधना प्रकल्पात अपेक्षित पाणीसाठा होऊ शकला नसल्याने प्रकल्पाची मृत साठ्याकडे वाटचाल होत असल्याने प्रकल्पावर आधारित जालना आणि परभणी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीबाणी होण्याची भीती व्यक्त हाेऊ लागली आहे.

2 percent water level remain in nimna dudhana project
Lasalgaon Bandh: पाण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील 'या' गावात कडकडीत बंद, Video

कौसडी गावात पाणीटंचाई

जिंतूर तालुक्यातील कौसडी गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. गावातील विहिरींनी तळ वाढल्याने गेल्या काही दिवसांपासून ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पाणी विकत घ्यावे लागत असल्याचा दावा ग्रामस्थ करु लागले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गावात नवीन जल योजनेचे काम अद्यापही पूर्णत्वाला आले नसल्याने ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. तात्काळ गावात पाण्याचे टँकर सुरू करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

2 percent water level remain in nimna dudhana project
मतदान होताच नीरेचे पाणी बंद, पंढरपूरसह माळशिरसचे शेतकरी हतबल; रणजितसिंह मोहिते पाटलांनी घातलं लक्ष, साेमवारी...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com