बीडच्या पट्टीवडगावात छेडछाडीला कंटाळून १७ वर्षीय मुलीची आत्महत्या

या घटनेने जिल्ह्यात खळबळ
Beed crime news
Beed crime newssaam tv
Published On

बीड : गावातील रोडरोमियोच्या सततच्या छेडछाडीला कंटाळून, बारावीच्या वर्गात शिक्षण घेण्याऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने, राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (self- slaughter) केली आहे. ही संतापजनक घटना बीडच्या (Beed) पट्टीवडगाव (Pattiwadgaon) गावात घडली आहे.

अल्पवयीन मुलीने नुकतीच बारावीची परिक्षा दिली होती. तिचे वडील राज्य परिवहन मंडळात चालक असून, सध्या पालघर (Palghar) येथे कार्यरत आहेत. अल्पवयीन मुलीची आई सुमित्रा यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या घराशेजारी राहणारा, रोडरोमिओ अकबर बबन शेख हा तरुण, मागील काही दिवसापासून अल्पवयीन मुलीगी कॉम्प्युटर (Computer) क्लासला जात येत असताना तिला छेडत होता. रस्त्यात अडवून वेडेवाकडे बोलणे, सतत छेड करणे अशा पद्धतीने तो तिला त्रास देत होता.

हे देखील पाहा-

याबाबत आईला मुलीने सांगितले होते. ६ मे दिवशी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी अकबरला बोलावून घेऊन तिला त्रास न देण्याबद्दल बजावले होते. परंतु त्याच्या वागण्यात फरक पडला नाही. त्याचे त्रास देणे सुरु असल्याचे मुलीने आईला सांगितले होते. यावर वडील आणि भाऊ आला की आपण मार्ग काढू, अशी आईने तिची समजूत घातली. अखेर सततच्या त्रासाला कंटाळलेल्या अल्पवयीन मुलीने, घरात कोणी नसताना घराच्या माळवदाच्या आडुला साडीने गळफास घेत आत्महत्या केली आहे.

Beed crime news
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांची टोळी जेरबंद

दरम्यान आई घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर नातेवाईकांच्या मदतीने खाली उतरवत, अल्पवयीन मुलीला स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी सदर फिर्यादीवरून रोडरोमिओ असणाऱ्या अकबर बबन शेख याच्यावर, बीडच्या बर्दापूर पोलीस ठाण्यात, कलम ३०५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान, गुन्हा दाखल होताच, आरोपी फरार झाला असून अद्याप त्याला अटक करण्यात आली नाही. या प्रकरणी बर्दापूर पोलीस (police) अधिक तपास करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com