
Beed News: बीडमध्ये (Beed) १५ वर्षीय मुलाची हत्या करुन त्याचा मृतदेह झाडाला लटकवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यातल्या नित्रुड गावामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या तरुणाच्या नातेवाईकांनी बीड पोलिस (Beed Police) ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी याप्रकरणी ३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या माजलगाव तालुक्यातील नित्रुड गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. 15 वर्षांचा गुलाम मोहम्मद हाफिज मुर्तजा शेख या मुलाची हत्या करण्यात आली आहे. गुलाम इयत्ता नववीमध्ये शिकत होता. मंगळवारी सकाळी सात वाजता गुलाम आपल्या लहान बहिणी आणि भावासोबत सरपण आणण्यासाठी घराबाहेर पडला. तो आपल्या आजोबांच्या शेतात सरपण आणण्यासाठी गेला होता. त्याचवेळी तीन ते चार जणांनी त्याला रस्त्यात अडवत मारहाण केली.
भावाला मारहाण होत असल्याचे पाहून गुलामचे बहीण आणि भाऊ खूप घाबरले. घरी पळत पळत जाऊन त्यांनी घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. याची माहिती मिळताच गुलामच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. तर त्यांना गुलामचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसला. या घटनेची माहिती मिळताच दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा करत त्यांनी गुलामचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास डाके, महादेव डाके, हनुमंत वानखेडे या तिघांनी आमच्या शेतातून का जातोय अशी विचारणा करत गुलामला बेदम मारहाण केली. मारहाण केल्यानंतर आरोपी ऐवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी सरपण आणण्यासाठी आणलेल्या ओढणीनेच गुलामचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्यांनी गुलामचा मृतदेह लिंबाच्या झाडाल लटकवला.
याप्रकरणी तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. दरम्यान, या घटनेमुळे नित्रुड गावामध्ये एकच खळबळ उडाली. गुलामच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन करत आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.