धक्कादायक : फिरायला नेण्याचा बहाणा करत 14 वर्षीय मुलीवर बलात्कार; 5 दिवसातली दुसरी घटना

या नराधम आरोपीचं नावं शाहरुख शकील शेख असं असून त्याच्याविरुद्ध जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धक्कादायक : फिरायला नेण्याचा बहाणा करत 14 वर्षीय मुलीवर बलात्कार; 5 दिवसांतली दुसरी घटना
धक्कादायक : फिरायला नेण्याचा बहाणा करत 14 वर्षीय मुलीवर बलात्कार; 5 दिवसांतली दुसरी घटनाSaam TV
Published On

नागपूर : नागपूरात पाच दिवसांत अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या दोन घटना घडल्याने नागपुरकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर नागरिकांचा पोलिस प्रशासनावरील रोष वाढला आहे. कायद्याचा धाक या नराधमांना वाटतो की नाही असा सवाल नागपुरकर (Nagpur) उपस्थित करत आहेत. काही दिवसांपुर्वी अंबाझरी य़ेथे आणि आता जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या घटना घडल्या आहेत.

या घटनेबाबत जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत घटलेल्या पीडित मुलीचे वय १४ वर्ष असून या मुलीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने घेऊन गेला आणि नराधमाने या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या नराधम आरोपीचं नावं शाहरुख शकील शेख असं असून त्याच्याविरुद्ध जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्कादायक : फिरायला नेण्याचा बहाणा करत 14 वर्षीय मुलीवर बलात्कार; 5 दिवसांतली दुसरी घटना
सोलापुरात एकाचवेळी निघाली 3 मित्रांची अंत्ययात्रा; राऊतांना भेटण्यासाठी जाताना घडली दुर्दैवी घटना

दरम्यान, मागील पाच दिवसांपूर्वी अंबाझरी पोलीस स्टेशन (Ambazari Police Station) हद्दीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला होता. बलात्काराच्या घटनेनं नागपुरात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com