Kokan Accident News : कोकणात अपघातवार! दोन भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू , २४ जण जखमी

आज सकाळपासूनच कोकणात दोन ठिकाणी मोठे अपघात झाले आहेत.
Kokan News
Kokan NewsSaam TV

Kokan News : कोकणात आजची सकाळ दुर्देवी ठरली आहे. आज सकाळपासूनच कोकणात दोन ठिकाणी मोठे अपघात झाले आहेत. या भीषण अपघातांमुळे एकूण १३ जणांचा जागीच मृत्यू झालाय तर २४ जण गंभीर जखमी आहेत. मुंबई-गोवा महार्गावर कणकवली येथे आणि माणगाव जवळ हे दोन अपघात झाले आहेत. (Latest Marathi News)

मुंबई-गोवा महार्गावर कणकवली येथे पहिला अपघात झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली येथे वागदे पुलानजीक खाजगी बसला भीषण अपघात झाला आहे. गडनदी पुलावर धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. बस मुंबई ते गोवाच्या दिशेने जात होती.

या बसमध्ये ३६ प्रवासी होते. पहाटे ४ वाजता हा अपघात झाला असून या अपघातात ४ ठार तर २३ जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Kokan News
Latur ST Bus Accident : लातुरात एसटी चालकाचा बसवरील ताबा सुटून भीषण अपघात; ३० प्रवासी जखमी

तर दुसरी घटना  माणगाव तालुक्यातील रेपोली गावाजवळ पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघात ट्रक रस्त्याच्या विरूद्ध दिशेने येऊन इको कारवर धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक चार वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. इको कार आणि ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला.

Kokan News
Accident News: कारची दुचाकीला धडक; दोन युवक ठार, एक जखमी

कार आणि ट्रकमधील टक्कर एवढी जोरदार होती की इको कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस तातडीने अपघातस्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांना स्थानिक ग्रामस्थांसह बचावकार्य सुरु केलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com