Maharashtra Corona Update: राज्यात कोरोनाचा धोका कायम; दिवसभरात ९ जणांचा मृत्यू, अशी आहे आजची ताजी आकडेवारी

Maharashtra Corona Update: राज्याच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, बुधवारी १२ एप्रिल रोजी महाराष्ट्रात १,११५ नवीन रुग्ण आढळले आहेत.
Coronavirus in maharashtra
Coronavirus in maharashtra SAAM TV
Published On

रुपाली बडवे

Maharashtra Corona Update News: राज्यात कोरोना विषाणूचा धोका कायम आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, बुधवारी १२ एप्रिल रोजी महाराष्ट्रात १,११५ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ५,४२१ वर पोहोचली आहे. याशिवाय, दिवसभरात राज्यात नऊ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

राज्यात आज दिवसभरात ५६० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनाने बरे झालेल्यांची संख्या ७९,९८, ४०० इतकी झाली आहे. राज्यात दिवसभरात ९ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात कोरोनातून बरे होण्याचा दर ९८.११ टक्के एवढा आहे. तर मृत्यूदर १.८२ टक्के इतका आहे. आता राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ८१, ५२, २९१ इतकी झाली आहे. राज्यात गेल्या दहा दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.

Coronavirus in maharashtra
India Corona Update: चिंता वाढली! देशात एका दिवसात 7,830 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, 223 दिवसांतील हा सर्वात मोठा आकडा!

भारतातील कोरोना व्हायरच्या (Corona Virus) संसर्गाच्या वेगाने सरकारसोबतच नागरिकांची चिंता वाढवली आहे. देशात कोरोना रुग्णांची (Corona Patient) संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

रोज कोरोना रुग्णांचा धडकी भरवणारा नवीन आकडा समोर येत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात मोठ्यासंख्येने कोरोना रुग्ण आढळले आहेत. २२३ दिवसांतील हा सर्वात मोठा आकडा असल्याचे सांगितले जात आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health) दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशामध्ये ७,८३० कोरोना रुग्ण आढळले आहेत. देशात गेल्या २४ तासांत संसर्गामुळे १६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांचा हा आकडा २२३ दिवसांतील सर्वाधिक आहे.

वाढत्या कोरोनामुळे मुंबई महापालिकेने घेतली खबरदारी

देशातील विविध राज्यांमध्ये कोविड-१९ विषाणू संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात देखील मागील काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंदाजानुसार मे महिन्यामध्ये कोविड संसर्ग बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Coronavirus in maharashtra
Wardha Corona Update: कोरोनाचा धोका वाढतोय; वर्ध्यात २४ तासात ९ कोरोना बाधित

या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची सर्व रुग्णालये, तसेच सर्व खासगी रुग्णालयांनी देखील कोविड उपचारांसाठी सुसज्ज रहावे, अशी सूचना काल मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी केली आहे.

विशेषतः ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना सक्ती नसली तरी त्यांनी गर्दीच्या ठिकाणी वावरताना खबरदारीचा उपाय म्हणून मास्क लावणे आवश्यक आहे. मात्र महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये सर्व कर्मचारी, रूग्ण तसेच येणाऱ्या अभ्यागतांना यापुढे मास्क लावणे सक्तीचे असेल, असेही चहल यांनी निर्देश दिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com