10/12 वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार क्रीडा गुणांची सवलत

कोरोनामुळे क्रीडा स्पर्धा नसली तरीही दहावी-बारावीच्या वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार क्रीडा गुणांची सवलत.
10/12 वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार क्रीडा गुणांची सवलत
10/12 वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार क्रीडा गुणांची सवलतSaam Tv

दीपक क्षीरसागर

लातूर : राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळांच्या स्पर्धात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना राज्य शासन दरवर्षी 10 वी व 12 वीच्या क्रीडा गुणांची सवलत देत असते. पण गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे Corona क्रीडा स्पर्धा आयोजित झाल्याच नाहीत. मागील वर्षांपूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी खेळात यश मिळवलं आहे त्यांना आता गुणांची सवलत दिली जात असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कासगावडे यांनी सांगितले आहे. 10th and 12th students will get sports marks

शालेय विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी शालेय स्तरापासून खेळांना महत्त्व दिलं जात आहे. राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध क्रीडा स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना त्याच्या स्तराचा विचार करून 10 वी व 12 वी च्या बोर्ड परीक्षेत 5 गुणापासून ते 25 गुणापर्यत सवलत दिली जात असते.

हे देखील पहा-

या वर्षी लातूर Latur जिल्ह्यातील इयत्ता दहावीचे 420 विद्यार्थी तर बारावीच्या 198 विद्यार्थ्यांनी क्रीडा गुणांची सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालायाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यास मंजुरी देण्यात आली आहे.

10/12 वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार क्रीडा गुणांची सवलत
आदिवासी शेतक-यांना भात लागवडीसाठी प्रतिक्षा पावसाची ..

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा कहर मोठा होता. देशात सर्वत्र लॉकडाऊन Lockdown असल्याने कुठेही क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या नाहीत. यावर्षीच्या निर्णयानुसार इयत्ता 6 वी पासून 12 वी पर्यत राज्य व राष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांनी यश मिळवलं असल्यास त्यांना क्रीडा गुणांची sports सवलत दिली जाणार आहे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कासगावडे यांनी सांगितले आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com