SSC-HSC Exam: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; पुरवणी परीक्षेसंदर्भात बोर्डाची मोठी अपडेट

SSC-HSC Supplementary Exam: राज्यात आज मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे दहावी- बारावीची दुपारी तीन वाजता घेण्यात येणारी पुरवणी परीक्षा रद्द केली जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.
SSC-HSC Exam
SSC-HSC ExamSaam Tv
Published On

दहावी- बारावीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. सध्या संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचू न शकल्यास त्यांना परीक्षा देता येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले आहे.

सध्या राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. या परिस्थितीत जर पुरवणी परीक्षेसाठी दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचता नाही आले तर त्यांनी पुन्हा परीक्षा देता येणार आहे.

दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षेचा दुपारी तीन वाजता होणारा पेपर मंडळाकडून रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊनच दुपारचा पेपर रद्द करण्याचा निर्णय जाहीर करु, अशी माहिती गोसावी यांनी दिली आहे.

SSC-HSC Exam
Pune Heavy Rain : पुण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, अनेकांच्या घरात पाणी शिरलं; पाहा VIDEO

दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांचा उद्या होणारा पेपरदेखील आम्ही रद्द करु, असे सांगण्यात आले आहे. राज्यभरात आज पुरवणी परीक्षा होत असल्याने सकाळी ११ वाजताचा पेपर रद्द करता येणार नसल्याची माहिती गोसावी यांनी दिली आहे. आज सकाळी दहावी पुरवणी परीक्षेचा सायन्सचा पेपर तर बारावीच्या विद्यार्थ्यांचा गणिताचा पेपर आहे.

SSC-HSC Exam
Pune Rain: पुण्यात धडकी भरवणारा पाऊस, रस्त्यांवर कमरेइतकं पाणी; प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com