Kolhapur Politics: कोल्हापुरात काँग्रेसवर नामुष्की; मधुरिमाराजेंची माघार, सतेज पाटलांचा संताप

Assembly Election: विधानसभा निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी कोल्हापुरमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या. यानंतर सतेज पाटील आणि शाहू महाराजांमध्ये वादाची ठिणगी पडली. नेमकं काय घडलं कोल्हापूरमध्ये. पाहूयात. या स्पेशल रिपोर्टमध्ये.
Kolhapur Politics
Kolhapur Politics
Published On

भरत मोहोळकर, साम प्रतिनिधी

तुम्हाला प्रश्न पडला असेल की सतेज पाटील शाहू महाराजांवर एवढे का भडकले? कारण काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजेंनी अखेरच्या क्षणी माघार घेतल्याने कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसवर अपक्षाला पाठिंबा देण्याची नामुष्की ओढावलीय. त्यामुळे काँग्रेस नेते सतेज पाटलांनी खासदार शाहू छत्रपतींवर संताप व्यक्त केलाय. एवढंच नाही तर राजेंनी फसवणूक केल्याची भावनाच सतेज पाटलांनी बोलून दाखवलीय.

अर्ज मागे घेतल्यानंतर मालोजीराजेंनीही मधुरिमा राजेंना हात ओढत बाहेर नेलं.शाहू महाराजांची सून मधुरिमाराजेंनी माघार घेतल्यानंतर सतेज पाटलांनी मालोजीराजेंवरही संताप व्यक्त केला. नेमकं काय म्हटले ते ऐका.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसने राजेश लाटकरांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर रात्रीतून सूत्रं फिरली आणि राजेश लाटकरांच्या उमेदवारीला कात्री लावून मधुरिमाराजेंना उमेदवारी जाहीर झाली. मात्र लाटकरांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. माघारीच्या दिवशी लाटकर नॉट रिचेबल झाले. त्यानंतर नाट्यमय घ़डामोडी झाल्या आणि अखेरच्या क्षणी मधुरिमाराजेंनी माघार घेतली. त्यामुळे काँग्रेसने आता राजेश लाटकरांनाच पाठिंबा दिलाय.

मधुरिमाराजेंच्या माघारीमुळे शाहू घराणं विरुद्ध सतेज पाटील यांच्यात वादाची ठिणगी पडलीय.. तर काँग्रेसवर उमेदवाराच्या माघारीने नामुष्की ओढावलीय.. त्यामुळे आता काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूशीचा फटका राजेश लाटकरांना बसून शिंदे गटाचे क्षीरसागर मुसंडी मारणार का? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com