Congress
CongressSaam TV

Kalyan Politics : कल्याण-डोंबिवलीत भाजपला धक्का, पदाधिकारी धरणार काँग्रेसचा 'हात'

Congress in Kalyan Politics : कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम विधानसभेवर दावा करणार असल्याची माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी दिली आहे.
Published on

अभिजित देशमुख, कल्याण

Kalyan Dombivali Latest News :

लोकसभानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. निवडणुका जशा जवळ येत आहेत, तसे नेत्यांनी पक्षांतर सुरु केलेय. सत्ताधारी भाजपमधील काही नेते काँग्रेसमध्ये जात असल्याचे समोर आलेय. कल्याण डोंबिवलीतील भाजपचे अनेक पदाधिकारी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. या पदाधिकाऱ्यांकडून कल्याणमध्ये काँग्रेसला नवसंजीवनी मिळणार आहे.

राज्यभरात लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर कल्याण डोंबिवलीतील काँग्रेसची घरघर थांबल्याचे दिसून येतेय. गेल्या काही वर्षांत काँग्रेस सोडून भाजप व इतर पक्षात गेलेले काँग्रेसचे पदाधिकारी पुन्हा घरवापसी करत काँग्रेस पक्षात परतत आहेत. दोन दिवसांपूर्वी मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, त्या पाठोपाठ आता भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश मुथा हे देखील काँग्रेस प्रवेश करणार आहेत. मुंबईत प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा होणार आहे.

Congress
Pune Politics: पुण्यातील राजकारणात मोठी घडामोड; काँग्रेस नेत्याच्या हकालपट्टीची मागणी, भाजपच्या वाटेवर असल्याची होती चर्चा

राकेश मुथा यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षांकडून केली होती, ते कल्याण डोंबिवलीत युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. मात्र 2016 मध्ये त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून काही ठराविक जणांनाच संधी दिली जाते,भेदभाव केला जातो ,वरिष्ठ पदाधिकाऱ्यामुळे पक्षात काम करण्यास संधी मिळत नसल्याने मी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार घेतल्याचे मुथा यांनी सांगितले. तर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी राकेश मुथा एकटेच नाही तर भाजपसह इतर पक्षातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले. उद्या नाना पटोले यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे.

येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील चार मतदार संघामधील कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम या जागा आम्हाला मिळाव्यात अशी मागणी पक्ष श्रेष्ठीकडे करनार असल्याचा पुनरुच्चार जिल्हाध्यक्ष पोटे यांनी केला. काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरू झाल्याने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली परिसरात काँग्रेस पक्षाला नवी संजीवनी मिळत असल्याची चर्चा आहे.

Congress
Pune Politics: पुण्यातील राजकारणात मोठी घडामोड; काँग्रेस नेत्याच्या हकालपट्टीची मागणी, भाजपच्या वाटेवर असल्याची होती चर्चा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com