Maharashtra Election : शिंदेंनी फुंकलं राज ठाकरेंविरोधात रणशिंग? माहीम जिंकणार?

Maharashtra Election 2024 : माहीम विधानसभा निवडणूक रंगतदार होणार आहे. एकनाथ शिंदेंनी महीममधून माघार घेण्यास नकार दिलाय.
Maharashtra Election 2024
Maharashtra Election 2024Saam TV
Published On

Maharashtra Assembly Elections 2024 Latest News : विधानसभा निवडणुकीची रंगत वाढतेय.. त्यातच माहीममध्ये राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरेंविरोधात शिंदे गटाचे सदा सरवणकर रिंगणात आहेत. त्यांनी माघार घ्यावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केलेत. मात्र माहीममधून माघार घेण्यास सदा सरवणकरांनी (Sada sarvankar vs Amit thackeray) नकार देत विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही मनसेवर निशाणा साधत माहीम जिंकण्याचा निर्धार व्यक्त केलाय. (CM Eknath Shinde vs Raj Thackeray : )

आता शिंदे विरुद्ध ठाकरे?

लोकसभा निवडणूकीत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या होत्या. त्यानंतर विधानसभेला मनसे महायुतीत येण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यातच मी पक्ष आणि चिन्ह कमावलं आहे. ते ढापलेलं नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना डिवचलं. तर अमित ठाकरेंनीही एकनाथ शिंदेंचा मुलगा श्रीकांत शिंदेंसाठी राज ठाकरेंनी सभा घेतल्याची आठवण करून दिलीय. (mahim dadar vidhan sabha Election)

Maharashtra Election 2024
Maharashtra Election: ठाकरेंसाठी त्याग करायला तयार, फक्त.... सदा सरवणकर यांनी राज ठाकरेंना घातली अट

त्यानंतर शिंदे गटाने मनसेविरोधात मोर्चा उघडलाय. आधी एकनाथ शिंदेंच्या निशाण्यावर उद्धव ठाकरे होते. मात्र आता अमित ठाकरेंविरोधात सदा सरवणकरांना रिंगणात उतरवून अमित ठाकरेंच्या विजयाचा मार्ग खडतर बनवलाय.. त्यामुळे भाजपच्या मदतीने राजपूत्र अमित ठाकरे माहीमचा किल्ला जिंकणार की सदा सरवणकर एकाकी झुंज देत ठाकरेंना चीतपट करणार? याकडे लक्ष लागलंय.

Maharashtra Election 2024
Maharashtra Politics : बाळासाहेब असते तर...; शायना एनसींबाबत केलेल्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे आक्रमक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com