Lok Sabha Election 2024: उत्तर प्रदेशात मायावती यांना धक्का, दानिश अली यांनी काँग्रेसमध्ये केला पक्षप्रवेश

Danish Ali : ऐन लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात मायावती यांना काँग्रेसने मोठा धक्का दिला आहे. अमरोहा लोकसभा खासदार दानिश अली यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
Danish Ali joins Congress
Danish Ali joins CongressSaam Tv
Published On

Danish Ali joins Congress:

ऐन लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात मायावती यांना काँग्रेसने मोठा धक्का दिला आहे. अमरोहा लोकसभा खासदार दानिश अली यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

राहुल यांची भारत जोडो न्याय यात्रा आणि सोनिया गांधी यांच्या भेटीपासून ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. दानिश अली अमरोहा येथून काँग्रेसच्या तिकिटावरच लोकसभा निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा आहे. दिल्लीत पवन खेडा आणि यूपी काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे यांच्या उपस्थितीत दानिश अली यांना काँग्रेसचे सदस्यत्व देण्यात आले. बसपाने दानिश यांना नुकतेच पक्षातून निलंबित केले होते. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Danish Ali joins Congress
BMC New Commissioner: भूषण गगराणी यांनी स्वीकारला बीएमसी आयुक्तपदाचा कार्यभार, जाणून घ्या त्यांची कारकीर्द

काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर दानिश म्हणाले की, ''आज देशाची परिस्थिती कोणापासून लपलेली नाही. एका बाजूला फुटीरतावादी शक्ती आहेत आणि दुसऱ्या बाजूला देशातील गरीब, वंचित आणि शोषित लोकांना न्याय देण्याची ताकद आहे. आज आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की, आपल्याला फुटीर शक्तींशी लढायचे असेल तर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी हातमिळवणी करावी लागेल.''   (Latest Marathi News)

Danish Ali joins Congress
Post Office Scheme: ज्येष्ठ नागरिकांसाठी बेस्ट आहे ही पोस्टाची योजना, गुंतवणुकीवर मिळणार जबरदस्त परतावा

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये सपाने काँग्रेसला दिलेल्या 17 जागांमध्ये अमरोहाचाही समावेश आहे. येथून दानिश अली यांना उमेदवारी मिळू शकते. दानिश अली यांना पक्षविरोधी कारवायांच्या आरोपाखाली बसपाने गेल्या वर्षी 9 डिसेंबर रोजी पक्षातून निलंबित केले होते. यावेळी अमरोहामधून दानिश यांच्या जागी बसपाने मुजाहिद हुसैन यांना उमेदवारी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com