Satara Constituency: सर्व निवडणुका मनाेमिलनाच्या माध्यमातून लढणार; उदयनराजेंची शिवेंद्रसिंहराजेंच्या कार्यकर्त्यांना ग्वाही

udayanraje bhosale: साेमवारी सातारा, कराड आणि वाई तालुक्यात महायुतीचे मेळावे झाले. लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन मेळाव्यानिमित्त केले.
udayanraje bhosale promises to be united with shivendraraje in satara
udayanraje bhosale promises to be united with shivendraraje in satarasaam tv
Published On

Satara :

साताऱ्यात फक्त लोकसभा आणि विधानसभा नाही तर सर्व निवडणुकांत असंच मनोमिलन राहणार अशी ग्वाही खासदार उदयनराजे भाेसले (Udayanraje Bhosale Latest Marathi News) यांनी जनतेला दिली. यावेळी उदयनराजेंनी छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन शिवेंद्रराजेंच्या (Shivendraraje Bhosale) कार्यकर्त्यांना देखील जाहीर सभेत आम्ही दाेघे एकत्र राहून जिल्ह्याच्या विकासाला आवश्यक ती मदत करु असा शब्द दिला. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

शेंद्रे (ता. सातारा) येथील (कै.) अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक हॉल येथे सातारा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीचा साेमवारी मेळावा झाला. या मेळाव्याला सातारा आणि जावळी तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.

udayanraje bhosale promises to be united with shivendraraje in satara
Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटना सहा जागा लढविणार, राजू शेट्टी आजही ठाम (Video)

त्यापूर्वी उदयनराजे भाेसले यांनी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना येथे त्यांचे काका माजी मंत्री (कै.) अभयसिंहराजे भोसले यांच्या स्मारकास अभिवादन केले. या मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत दाेन्ही नेत्यांनी जिल्ह्याच्या आणि साता-याच्या विकासासाठी आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही दिली.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन या मेळाव्यानिमित्त केले. या मेळाव्याला पालकमंत्री शंभूराज देसाई, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, आनंदराव पाटील, कराड उत्तरचे मनोज घोरपडे, चित्रलेखा माने - कदम, रामकृष्ण वेताळ उपस्थित हाेते.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, राजू भोसले, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सर्व आजी माजी पदाधिकारी, सदस्य, सातारा व जावली तालुक्यातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, सातारा पालिकेचे सर्व माजी पदाधिकारी, सदस्य, महायुतीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

udayanraje bhosale promises to be united with shivendraraje in satara
Parbhani Constituency: इफ्तार पार्टीला महादेव जानकर गेले नाहीत, महायुतीमधील एक गटाची ओढवली नाराजी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com