Saamana Editorial: पैसेवाल्यांच्या ताकदीवर मोदींना देवत्व बहाल करण्याची चढाओढ; ठाकरे गटाचा PM मोदींवर हल्लाबोल

Saamana Editorial Criticized BJP Narendra Modi: ठाकरे गटाचे मुखपत्र सामनामधून भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर परखड शब्दांत टीका केली आहे. भाजप नेते नितीन गडकरी यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
 सामनामधून भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर  टीका
Saamana EditorialSaam Tv

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांना देवानेच पाठवलं असल्याचा दावा करतात, पण त्यांच्या काळात देशातील देवत्व संपल्याची टीका ठाकरे गटाचे मुखपत्र सामनामधून नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. तसेच भाजप नेते नितीन गडकरी यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत नितीन गडकरी यांनी देशात पैशांची नाही, तर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नेत्यांची कमतरता असल्याचं वक्तव्य केलं होतं.

नितीन गडकरींच्या या वक्तव्यावरून आता भाजपवर सामनामधून (Saamana Editorial) हल्लाबोल झाला आहे. नितीन गडकरी हे त्यांच्या परखड वक्तव्यासाठी ओळखले जातात. देशामध्ये पैसा आहे, परंतु प्रामाणिकपणा नसल्याची खंत गडकरींनी (Narendra Modi) व्यक्त केली आहे. यावेळी सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखात म्हटलंय की, रावणाने प्रामाणिक व्यक्तींना तुरूंगात टाकलं होतं. तरीही रावणाचा वध झालाच. तसंच देशात देखील सत्य मरणार नाही, असं सामनामध्ये म्हटलं आहे.

निवडणूक आयोगास वेठीस धरलं. भारतात निवडणुका प्रामाणिकपणे होत आहेत का, याबद्दल जनतेच्या मनात शंका आहे. त्यांनी आतापर्यंत अप्रमाणिकपणे सर्व निवडणुका जिंकल्या आहेत. निवडणूक रोख घोटाळा करून निवडणुका लढल्या जात असल्याचा दावा सामनामधून करण्यात आला आहे. मागील दहा वर्षात मोठी लुटमार केल्याचं म्हटलं आहे. मोदी (Narendra Modi) यांनी सार्वजनिक कंपन्या, अदानीसारख्या मित्रांना अर्धा देश विकल्याचं म्हटलं आहे.

 सामनामधून भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर  टीका
PM Modi Interview: जुना इतिहास खोडून काढणार, दक्षिणेत PM मोदींना सर्वाधिक अपेक्षा; केलं मोठं वक्तव्य

जगातील सर्वात भ्रष्ट आणि प्रामाणिक देशांच्या यादीमध्ये भारताचे स्थान कायम घसरलेले दिसते. प्रामाणिक देशांच्या यादीत भारत अप्रामाणिक म्हणून गृहीत धरला जातो, हे दुःखदायक असल्याचं सामनाने म्हटलं आहे. देशात सत्य निस्तेज झालंय, धर्म भ्रष्ट तर विश्वासघात वाढल्याचा टोला सामनाने लगावला आहे. पैसा हीच देशातील काही लोकांची ताकद बनली आहे. त्यांच्याच ताकदीवर मोदींना देवत्व बहाल करण्याची स्पर्धा लागल्याची टीका सामनामधून ठाकरे गटाने (Thackeray Group) केली आहे.

 सामनामधून भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर  टीका
Narendra Modi: पंतप्रधान मोदी आज २५ हजार महिलांसोबत साधणार संवाद; वाराणसीत 'नारी शक्ती' ठरणार भाजपचं 'शस्त्र'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com