ऐन लोकसभा २०२४ निवडणूक तोंडावर असताना पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसला. अकलुजचे भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या प्राथामिक सदस्याचा राजीनामा दिला. आता ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. यासोबतच माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचंही बोललं जातंय.
धैर्यशील मोहिते पाटील पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे तगडे नेते होते. त्यांची अकलुजमध्ये मोठी ताकद आहे. त्यांनी अचानक पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने पश्चिम महाराष्ट्रात भाजपला (BJP) मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. कारण, धैर्यशील मोहिते पाटील यांच्या राजीनाम्यानंतर आता बाळ दादा मोहिते पाटील देखील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
आम्हाला ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सची भीती वाटतं नाही. १४ एप्रिल रोजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील वगळून संपूर्ण मोहिते पाटील कुटुंबं जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करणार आहेत, असं बाळ दादा मोहिते पाटील यांनी सांगितलं आहे.
लवकरच माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षात प्रवेश करणार आहेत, असल्याचं बाळ मोहिते म्हणाले आहेत. त्याचबरोबर फलटणचे संजीव राजे नाईक निंबाळकर आमच्या सोबत उघडपणे प्रचार करणार असून रणजितसिंह मोहिते पाटील हे मात्र भाजपात राहणार आहेत.
ते आमच्यासोबत येणार नाहीत, असंही बाळ मोहिते पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान माळशिरस तालुक्यातील उत्तम जानकर यांनी देखील मोहिते पाटील कुटुंबियांच्या या निर्णयाला पाठींबा दिला आहे. माळशिरस तालुक्यातून सुमारे १ लाख 40 हजार मताधिक्य मिळेल, असा विश्वास जयसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केला आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. धैर्यशील मोहिते पाटील पवार गटात प्रवेश करणार अशी शक्यता आहे. मी असं ऐकलंय की, त्यांना हातात तुतारी घ्यायची इच्छा आहे. पण माझा एवढा संपर्क झालेला नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.