Maharashtra Election : ब्रेकिंग! ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी उद्या जाहीर होणार, कुणाला मिळणार संधी?

Mahavikas Aaghadi Seat Sharing Formula : उद्या शिवसेना ठाकरे गटाकडून ठाकरे गटाच्या 15-16 जागांवरील उमेदवारांची घोषणा करणार असल्याची मोठी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
Loksabha Election 2024: |Uddhav Thackeray
Loksabha Election 2024: |Uddhav ThackeraySAAM TV

मयुर राणे, मुंबई|ता. २५ मार्च २०२४

Maharashtra Loksabha Election 2024 :

एकीकडे महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अशातच उद्या शिवसेना ठाकरे गटाकडून लढवल्या जाणाऱ्या 15-16 जागांवरील उमेदवारांची घोषणा करणार असल्याची मोठी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मधून ठाकरे गटाच्या उमेदवारांची अधिकृत घोषणा होणार आहे. (Maharashtra Loksabha Election 2024)

आज मातोश्रीवर बैठक!

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) जागा वाटपासंदर्भात आज शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, जयंत पाटील, ठाकरे गटाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे, संजय राऊत तसेच काँग्रेसकडून मुख्य नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे. तत्पुर्वी उद्या ठाकरे गटाच्या उमेदवारांची घोषणा होणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

'सामना'मधून होणार उमेदवारांची घोषणा!

आज मातोश्री येथे होणाऱ्या बैठकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांना शिवसेना ठाकरे गटाच्या १५ जागांवरील उमेदवारांची यादी दाखवली जाणार आहे. त्यानंतर उद्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून या उमेदवारांची घोषणा होणार असल्याचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले आहे.

Loksabha Election 2024: |Uddhav Thackeray
Hingoli Fire : होळीच्या दिवशीच अग्नितांडव!गोडाऊनला भीषण आग; लाखोंचं नुकसान

राऊतांचे भाजपवर टीकास्त्र!

दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊत यांनी केजरीवाल यांच्या अटकेवरुन भाजपवर जोरदार टीका केली. "या देशामध्ये अनेकदा एकाधिकारशाही, हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न झाला. पण या देशातल्या लोकांनी लोकशाहीचे रक्षण केले आता ही प्रयत्न सुरू आहे. ज्या पद्धतीने अरविंद केजरीवाल यांना अटक केली. त्यामधून मोदी हे केजरीवाल यांना घाबरलेत," असा टोला राऊत यांनी लगावला. (Latest Marathi News)

. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Loksabha Election 2024: |Uddhav Thackeray
Solapur News: शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखावर गुन्हा; हॉटेल मॅनेजरला मारहाण करून मोबाइल हिसकावल्याचा आरोप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com