Shirur Loksabha: राष्ट्रवादीचे संकटमोचक संकटात; मी ३ लाख मतांनी निवडून येणार... आढळराव पाटलांचा दावा

Amol Kolhe Vs Shivajirao Adhalrao Patil: शिरुर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामध्ये सामना होणार आहे.
Shivajirao Aadhalrao Patil Joining NCP:
Shivajirao Aadhalrao Patil Joining NCP:Saamtv

सागर आव्हाड, पुणे|ता. १४ एप्रिल २०२४

शिरुर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामध्ये सामना होणार आहे. निवडणुकीच्या दृष्टीने शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून मी 3 ते साडेतीन लाख मतांनी निवडून येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

काय म्हणाले आढळराव पाटील?

"शिरूर मतदार संघाच्या जनतेचा माझ्यावर विश्वास असून 2014 पेक्षा जास्त यंदाच्या या निवडणुकीत म्हणजेच 3 ते साडे तीन लाख मतांचा लीड मला मिळणार आहे. तसेच हडपसर मतदार संघातून कमीत कमी एक लाख मतांचे लीड मला मिळणार असल्याचा विश्वास शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आढळराव पाटील (Shivajirao Aadhalrao Patil) यांनी व्यक्त केला आहे.

"डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी जे जुन्नर तालुक्यातील कोपरे मांडव हे गाँव दत्तक घेतल होतं. त्या गावात आमच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने पाण्याचे टँकर सुरू केले. अमोल कोल्हे यांच्या जाहीरनाम्यात मी केलेली विकास कामे आहेत. ते माझ्या कामावरचं निवडून आले. यावेळी मी जास्त मताने निवडून येईन," असेही आढळराव पाटील यावेळी म्हणाले.

Shivajirao Aadhalrao Patil Joining NCP:
Pune News: हृदयद्रावक! फनफेअरमध्ये खेळताना शॉक लागून चिमुकल्याचा मृत्यू; कात्रजमधील घटना

"जे प्रकल्प पाच वर्षांपूर्वी होते ते आत्ता देखील त्याच परिस्थितीत आहेत. लोक सकाळपासून मला त्यांच्या अडीअडचणी सांगत असतात. मी खासदार नसताना देखील काम करत आहे कोल्हे यांचं कर्तव्य मलाच पार पाडाव लागत असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे संकटमोचक संकटात आहेत," असा टोलाही आढळराव पाटील यांनी लगावला.

Shivajirao Aadhalrao Patil Joining NCP:
Nashik Accident : नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस उड्डाणपुलावरून खाली कोसळली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com