Sangli Loksabha Election: तिढा सोडवण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयत्न, पण सांगलीत पाटलांचं ठरलंय

Maharashatra Loksabha Election: शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील आणि कार्यकर्ते नाराज झालेत. विशाल पाटील हे लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असून पाटील यांनी आज अपक्ष होत उमेदवारी अर्ज भरलाय.
Maharashatra Sangli  Loksabha Election
Vishal patil Saam Tv
Published On

Maharashatra Sangli Loksabha Election : सांगलीतील उमेदवारीवरून महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरूय. सांगलीमधील जागा काँग्रेसलाच मिळावी यासाठी तेथील नेते आग्रही आहेत. परंतु शिवसेनेने चर्चेआधीच आपला उमेदवार निवडला. चर्चा न करता शिवसेनेने उमेदवार ठरवल्यानं महाविकास आघाडीत वादाची तुतारी वाजलीय. सांगलीच्या उमेदवारीवरून सुरू असलेला वाद शिवसेना आणि काँग्रेसने बैठक करून सोडवावा असं मत शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत मांडलंय.

शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील आणि कार्यकर्ते नाराज झालेत. विशाल पाटील हे लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असून पाटील यांनी आज अपक्ष होत उमेदवारी अर्ज भरलाय. यामुळे सांगलीमध्ये कोण कोणाला धोबी पछाड देणार याकडे लक्ष लागलंय. याचदरम्यान शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी शिवसेना आणि काँग्रेसला हा वाद बसून मिटवण्यास सांगितलंय.

काय म्हणाले जयंत पाटील

सांगलीत शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चर्चा सुरू होत्या. त्या चर्चा सुरू असताना आम्ही येऊन बोलणं योग्य नव्हते. सांगलीची जागा काँग्रेस आणि शिवसेनेने मागितली होती. शरद पवारांपासून आम्ही सर्वांनी काँग्रेसला जागा मिळावी तोडगा निघावा, यासाठी प्रयत्न केले. आमचा सगळीकडे प्रयत्न आहे की भाजप समोर एककुटुंब उमेदवार उभा राहावं. एकास एक लढत झाली तर विजयी होईल. यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम केलं पाहिजे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भूमिका सांगितल्यानंतर आम्ही बोलणं योग्य नाही. पेटवणारे पेटवत असतात काहींचा यामागे हेतू वेगळा असतो.

पेटवणारे एकदा एकत्र आले आणि त्यांच्यामध्ये आलं की अवघड होतं. मी विशाल पाटील यांच्या संपर्कात मी आहे. सांगलीचा तिढा सुटला पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी हा बसून विषय संपवावा. ज्यावेळी हा वाद सुरू होता त्यावेळी शरद पवार आणि मी स्वतः वाद मिटवण्याचा प्रयत्न आम्ही केला होता. दरम्यान अजून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज भरला नाही अजून त्यांच्यात खूप काही होऊ शकते. अर्ज मागे घेण्यापर्यंत वेळ असल्याचं म्हटलंय.

विशाल पाटलाचं ठरलंय

दरम्यान सांगलीची जागा शिवसेनेला मिळाल्याने काँग्रेस नेते विशाल पाटील आणि त्यांची समर्थक नाराज झालेत. आज विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीला धक्का देत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचसोबत आता विशाल पाटील हे उद्या शक्तीप्रदर्शन करत काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. यामुळे महाविकास आघाडीचं काहीही ठरलं तरी विशाल पाटील यांचं ठरलंय.

Maharashatra Sangli  Loksabha Election
Vishal Patil: सांगलीमध्ये महाविकास आघाडीला धक्का, विशाल पाटील यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com