(सागर जाधव, पुणे)
Pune Loksabha Election Know BJP Candidate Murlidhar Mohol Wealth : पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप नेते आणि महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यावर तब्बल १४ कोटी रुपयांचे कर्ज आहे. मोहोळ यांच्याकडे एकूण संपत्ती २४ कोटी ३२ लाख ४४ हजार ४८३ रुपयांची संपत्ती आहे. त्यात त्याच्यावर १४ कोटी रुपयांचे कर्ज आहे. मुरलीधर मोहोळ यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जातून ही माहिती समोर आलीय.
यंदा पुण्यात तिरंगी लढत अधिक चुरशीची होणार आहे. महाविकास आघाडी आणि वंचितची जागावाटपावरून बोलणी फिसकटल्यानंतर 'वंचित'ने आपला उमेदवार दिलाय. यामुळे महाविकास आघाडीविरुद्ध महायुती, अशी सरळ होणारी लढत आता तीन उमेदवारांमध्ये होणार आहे. गुरुवारी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
या उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीची माहिती दिलीय. मुरलीधर मोहोळ यांची एकूण संपत्ती २४ कोटी ३२ लाख ४४ हजार ४८३ रुपये असल्याचे समोर आले आहे. यामध्ये मोहोळ यांच्यावर १४ कोटी ८५ लाख रुपयांचे कर्ज आहे. मोहोळ यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून कला शाखेची पदवी प्राप्त केली आहे. स्वतः मोहोळ, त्यांची पत्नी आणि दोन मुली यांच्या नावाने एकूण जंगम मालमत्ता ५ कोटी २६ लाख ७६ हजार ७८८ रुपये इतकी आहे.
मोहोळ यांची एकूण स्थावर मालमत्ता १९ कोटी ५ लाख ६७ हजार ६९५ इतकी आहे.त्यामध्ये मुळशी तालुक्यातील मुठा गावात ३६ गुंठे,कासार आंबोळी येथे २७ गुंठे,भूगाव येथे १४ गुंठे जमीन आहे. तर वाई तालुक्यातील येरुली गावात ३.१८ एकर जमीन आहे. मोहोळ यांच्या कुटुंबाकडे ४१ तोळे सोन्याचे दागिने आहेत. तर २२ लाख १४ हजार ३८२ रुपयांचे एकच वाहन आहे.
सोने - २९.४५ लाख
स्थावर मालमत्ता -१९.०५ कोटी
बॅंकेतील ठेवी - ६६.७४ लाख
कर्ज - १४.८५ कोटी
वाहने - २२.१४ लाख
शेअर्स - ३.९६ कोटी
एकूण - २४.३२ कोटी
कोण आहेत मुरलीधर मोहोळ?
मुरलीधर मोहोळ देवेंद्र फडणवीसांच्यादेखील जवळचे मानले जातात. मोहोळ यांचा दांडगा जनसंपर्क आहे. पुणे आणि आजुबाजूच्या गावांमध्येही भाजपची ताकद वाढवण्याचे काम मुरलीधर मोहोळ यांनी केलंय. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत मोहोळ यांचा सक्रिय सहभाग होता. केंद्रीय मंत्री अमित शहांनीदेखील यांनीदेखील मतदार संघाचा दौरा केला होता. या सगळ्या दरम्यान मुरलीधर मोहोळ सक्रीयपणे सहभागी होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.