Maharashtra Election: मुरलीधर मोहोळांच्या पदयात्रेनं पुण्यातील ट्रॉफिक होणार जॅम; असा असणार रॅलीचा मार्ग

Pune Traffic : महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि शिरूर मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आपले उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत. यावेळी महायुतीचे सर्व प्रमुख नेते उपस्थितीत राहणार आहेत.
Maharashtra Election: मुरलीधर मोहोळांच्या पदयात्रेनं पुण्यातील ट्रॉफिक होणार जॅम; असा असणार रॅलीचा मार्ग
Mahayuti Candidate Murlidhar Mohol Saam Tv

Mahayuti Candidate Murlidhar Mohol Nomination : पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आज भव्य शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर मोहोळ यांच्या प्रचारासाठी नदीपात्रात सभादेखील होणार आहे. दरम्यान शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटीलदेखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या दोन्ही नेत्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महायुतीचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाताना पदयात्रा काढली जाणार आहे.

ही पदयात्रा कोथरूड ते डेक्कनपर्यंत काढली जाणार आहे. मात्र या पदयात्रेमुळे शहरातील मुख्य भागातील वाहतुकीवर परिणाम होणार आहे. भाजप नेते आणि महायुतीचे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची पदयात्रेला सकाळी ९ वाजता सुरुवात होणार आहे. ही पदयात्रा कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून ते डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळपर्यंत होणार आहे. साधार तीन ते ४ किलोमीरटर पदयात्रा काढली जाणार आहे. मात्र या पदयात्रेमुळे येथील वाहतुकीवर परिणाम होणार आहे.

मुरलीधर मोहोळ आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापासून रॅली काढणार आहेत. या रॅलीचा समारोप नदीपात्रात करण्यात येणार असून या ठिकाणी त्यांच्या प्रचाराची सभा देखील होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास यांच्यासह महायुतीचे अन्य पदाधिकारी या सभेला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

याचबरोबर महायुतीच्या बारामतीमधील उमेदवार सुनेत्रा पवार, शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि मावळचे उमेदवार श्रीरंग बारणेदेखील या सभेला उपस्थित राहणार असल्याचं म्हटलं जात आहे.

पदयात्रेचा असा असेल मार्ग

सुरुवात - कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ असलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहापासून सुरू होईल. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा पुतळा- त्यानंतर मृत्यूजयेश्वर मंदिर- श्री. दशभुजा गणपती मंदिर- नळस्टॉप मेट्रो स्टेशन -रांका ज्वेलर्स-गरवारे कॉलेज चौक- श्री खंडोबाजी चौक -समारोप - छत्रपती संभाजी महाराज पुतळा

Maharashtra Election: मुरलीधर मोहोळांच्या पदयात्रेनं पुण्यातील ट्रॉफिक होणार जॅम; असा असणार रॅलीचा मार्ग
Lok Sabha Election : दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार संपला, शुक्रवारी होणार मतदान; राहुल गांधींसह या दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com