Pune Election 2024 Winner: पुण्यात धंगेकर पॅटर्न फेल; भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांचा मोठा विजय

Muralidhar Mohol Won From Pune Lok Sabha Constituency: पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा विजय झाला आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा पराभव झाला आहे.
Pune Election 2024 Winner: पुण्यात धंगेकर पॅटर्न फेल; भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांचा मोठा विजय
Pune Lok Sabha Election Winner Muralidhar Mohol Won Against Vasant More Saam TV

महत्त्वाच्या मतदारसंघापैकी एक असलेल्या पुणे मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. रविंद्र धंगेकर यांनी अनेक मुद्दे उपस्थित करून आणि मतदानाच्या आदल्या दिवशी केलेल्या आंदोलनामुळे निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. मात्र अखेर धंगेकरांचा हा पॅटर्न अपयशी ठरला असून भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी 1,20,234 मतांनी त्यांचा दारून पराभव केला आहे. मुरलीधर मोहोळ यांना 5,81,612 मतं मिळाली. तर रवींद्र धंगेकर यांना 4,61,378 मंत मिळाली आहेत.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांचाही या निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यांनी मनसेतून बाहेर पडत पुण्यातून निवडणूक लोकसभेची निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. राजकीय पक्षांच्या भेटीगाठी घेऊन वातावरण निर्माण केला होतं. मात्र त्यांचाही या निवडणुकीत पराभव झाला आहे.

भाजपकडे निवडणुकीत चांगल्या चेहऱ्याच्या शोधात होते. पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या रुपाने तो चेहरा भाजपला मिळाला होता. मात्र कॉंग्रेसचे आमदार यांना महाविकास आघाडीकडून लोकसभेचं तिकीट मिळालं. धंगेकर सामान्य कुटुंबातील चेहरा असल्यामुळे त्यांंना सहानुभूती मिळण्याची शक्यता होती. तिकीट जाहीर झाल्यांनंतर त्यांनी पुण्यात जनसंपर्क वाढवला होता. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी मोठं आव्हान होतं. मात्र अखेर मुरलीधर मोहोळ यांनी विजय मिळवला आहे. त्यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांना एकच जल्लोष केला.

Pune Election 2024 Winner: पुण्यात धंगेकर पॅटर्न फेल; भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांचा मोठा विजय
Kolhapur Lok Sabha Election Result : कोल्हापुरात यावेळी छत्रपतींच्या गादीचा करिष्मा; शाहू महाराजांनी दिली संजय मंडलिकांना शिकस्त

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे अनिल शिरोळे विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसच्या विश्वजीत कदम यांचा मोठ्या मतफरकाने पराभव केला होता. तर २०१९ च्या निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे गिरीश बापट विजयी झाले होते. त्यांचा ६३२,८३५ इतक्या मतांनी विजय झाला होता. त्यांनी काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा पराभव केला होता होता. आता तिसऱ्यांदा भाजपने या मतदारसंघात विजय मिळवला आहे.

Pune Election 2024 Winner: पुण्यात धंगेकर पॅटर्न फेल; भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांचा मोठा विजय
Loksabha Election Result: मोठी बातमी! अटीतटीच्या लढतीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी; उज्वल निकम यांचा पराभव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com