Pune Election 2024 Result: मुरलीधर मोहोळ की रवींद्र धंगेकर, पुण्यात कोण आघाडीवर? वसंत मोरेंचं काय झालं?

Muralidhar Mohol Took Lead Against Ravindra Dhangekar VS Vasant More: पुणेकरांनी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना जास्त पसंती दिली आहे. मुरलीधर मोहोळ हे नवव्या फेरी अखेरीस ५५,७३८ मतांची आघाडीवर आहेत. त्यांनी रविंद्र धंगेकर यांना मागे टाकले आहे.
Pune Lok Sabha Constituency: मुरलीधर मोहोळ की रवींद्र धंगेकर, पुण्यात कोण आघाडीवर? वसंत मोरेंचं काय झालं?
Muralidhar Mohol VS Ravindra Dhangekar VS Vasant MoreSaam TV

अक्षय मोरे, पुणे

पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये (Pune Lok Sabha Constituency) कोण खासदार होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार पुणेकरांनी महायुतीचे उमेदवार आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना सर्वात जास्त पसंती दिली आहे. मुरलीधर मोहोळ हे सध्या आघाडीवर आहेत. त्यांनी काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांना मागे टाकले आहे. काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे हे पिछाडीवर आहेत.

मुरलीधर मोहोळ हे नवव्या फेरी अखेरीस ५५,७३८ मतांची आघाडीवर आहेत. वडगाव शेरीमध्ये रविंद्र धंगेकरांना ४८७५ मतं आणि मुरलीधर मोहोळ यांना २९१५ मतं मिळाली. शिवाजीनगरमध्ये रविंद्र धंगेकरांना २६३६ मतं आणि रविंद्र धंगेकर यांना १६६० मतं मिळाली. कोथरुडमध्ये मोहोळ यांना ४५७४ मतं आणि धंगेकरांना ५२६५ मतं मिळाली. पर्वतीमध्ये मोहोळ यांना ३२९८ मतं आणि धंगेकरांना ६००६ मतं मिळाली. पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये महोळ यांना २९५५ मतं आणि धंगेकरांना ४६२९ मतं मिळाली. तर कसबामध्ये मोहोळ यांना ४८९२ मतं तर धंगेकर यांना ३५०५ मतं मिळाली.

Pune Lok Sabha Constituency: मुरलीधर मोहोळ की रवींद्र धंगेकर, पुण्यात कोण आघाडीवर? वसंत मोरेंचं काय झालं?
Loksabha Election Result: ब्रेकिंग! देशातील पहिला निकाल लागला; मतमोजणीआधीच भाजपने खातं खोललं

मुरलीधर मोहोळ यांनी रवींद्र धंगेकर यांना कसब्यात धोबीपछाड केले. रविंद्र धंगेकर यांना १२,९०० मतं तर मुरलीधर मोहोळ यांना १७,७५० मतं मिळाली. मुरलीधर मोहोळ कसबामधून ४८५० मतांनी आघाडीवर आहेत. वसंत मोरे ५००० च्या आसपास आहेत. मुरलीधर मोहोळ आघाडीवर असल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते आनंदी झाले आहेत. सध्या पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांचे कार्यकर्ते गुलालाची उधण करत आणि एकमेकांना पेढे भरवत जल्लोष करत आहेत. मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष शिगेला पोहचला आहे. निकाल जाही होण्याआधीच कार्यकर्ते आनंद व्यक्त करत आहेत.

Pune Lok Sabha Constituency: मुरलीधर मोहोळ की रवींद्र धंगेकर, पुण्यात कोण आघाडीवर? वसंत मोरेंचं काय झालं?
Baramati Lok Sabha : बारामतीत शरदचंद्र पवार गटाचा जल्लोष; सुप्रिया सुळे आघाडीवर असल्याने कार्यकर्त्यांनी फोडले फटाके

महत्वाचे म्हणजे मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाबाहेर त्याच्या नावापुढे खासदार असे लिहिण्यात आले आहे. निकाल जाहीर होण्याआधीच आणि खासदार म्हणून त्यांची निवड होण्यापूर्वीच मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरूवात केली आणि त्यांच्या नावापुढे त्यांनी खासदार लिहिले आहे. सध्या पुण्यामध्ये सगळीकडे आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहेत.

मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, 'मुरलीअण्णांचा विजय सोप्या पद्धतीने होणार याचा आम्हाला विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये दहा वर्षांत ज्या पद्धतीने विकास केला त्याच्यावर नागरिकांनी पुन्हा एकदा विश्वास ठेवला आहे. महापौर म्हणून मुरली अण्णा यांनी ज्यापद्धतीने काम केलं आहे त्याला देखील पुणेकरांनी प्रतिसाद दिला आहे. या दोन्हीच्या सहयोगाने मुरलीअण्णा यांचा कमीत कमी एक लाख मतांनी विजयी होईल असा आम्हाला विश्वास आहे.'

Pune Lok Sabha Constituency: मुरलीधर मोहोळ की रवींद्र धंगेकर, पुण्यात कोण आघाडीवर? वसंत मोरेंचं काय झालं?
Madha Lok Sabha Constituency: पवारांचा डाव भाजपवर भारी पडणार! माढ्यात 'कमळ' कोमेजणार; मोहिते पाटलांची 'तुतारी' जोरात वाजणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com