Loksabha Election 2024 : शिवसेना उमेदवारांची संभाव्य यादी आली समोर, १५ नेत्यांच्या नावाचा समावेश

Maharashtra Political news : शिवसनेच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. विद्यमान १३ पैकी ११ खासदारांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते, अशी देखील चर्चा आहे.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSaam Tv

Loksabha Election 2024 :

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस, ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी यांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि शरद पवार गटाच्या उमेदवारांची यादी अजूनही जाहीर झालेली नाही. जागावाटपाचा पेच सुटत नसल्याने याद्या जाहीर होण्यासाठी उशीर होत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र शिवसेनेचे संभाव्य उमेदवार कोण असतील याची सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे.

भाजप आणि शिवसेनेमध्ये जागावाटपावरुन मतभेद असल्याची चर्चा सुरु आहे. नाशिक, ठाणे, कोल्हापूर अशा काही जागांवर अद्यापही महायुतीत चर्चा सुरु आहे. शिवसनेच्या विद्यमान १३ पैकी ११ खासदारांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते, अशी देखील चर्चा आहे.

CM Eknath Shinde
Buldhana News: ब्रेकिंग! आमदार संजय गायकवाड यांची बंडखोरी; बुलढाणा लोकसभेसाठी भरला उमेदवारी अर्ज

शिवसेना उमेदवारांची संभाव्य यादी

रामटेक - राजू पारवे

बुलढाणा - प्रतापराव जाधव

यवतमाळ-वाशिम - भावना गवळी / संजय राठोड

हिंगोली - हेमंत पाटील

कोल्हापूर - संजय मंडलिक

हातकंणगले - धैर्यशील माने

नाशिक- हेमंत गोडसे

मावळ -श्रीरंग बारणे

शिर्डी - सदाशिव लोखंडे

दक्षिण-मुध्य मुंबई - राहुल शेवाळे

कल्याण-डोंबिवली - डॉ. श्रीकांत शिंदे

CM Eknath Shinde
Loksabha Election 2024: अमोल मिटकरी, सुनील शेळके राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक; अजित पवार गटाकडून ३७ नेत्यांची नावे जाहीर

या मतदारसंघातील उमेदवारांची चर्चा अजून सुरू

ठाणे - रवी फाटक यांच्या नावाची चर्चा सुरू

दक्षिण मुंबई- यशवंत जाधव यांच्या नावाची सुरू

उत्तर पश्चिम - (कलाकारांची चाचपणी सुरु)

छत्रपती संभाजीनगर - (उमेदवारांशी चर्चा सुरू आहे… अंबादास दानवे यांचा पक्षप्रवेश करून त्यांना उमेदवारी मिळू शकते)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com