Maharashtra Election: सातारा,रावेरचं ठरलं; पण माढ्याचा तिढा मात्र कायम; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर

Loksabha Election: राज्यातील महाविकास आघाडीमध्ये जागावाटपांचा तिढा सुटला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभेच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली.
Maharashtra Election
Maharashtra ElectionSaam Digital

गिरीश कांबळे, मुंबई

NCP SharadChandra Pawar Party Announced Third List :

आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून (NCP Sharadchandra Pawar Party) लोकसभेच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली. शरद पवार गटाने 10 जागांपैकी 9 जागांवर उमेदवार जाहीर केलेत. माढा बाबत अद्याप उमेदवार निश्चित नाही. साताऱ्यातून शशिकांत शिंदे यांनी उमेदवारी देण्यात आलीय तर रावेरमधून श्रीराम पाटील यांनी संधी देण्यात आलीय. (Latest News)

विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर कोणता उमेदवार द्यावा याची चाचपणी करण्यात आली. चाचपणी अखेर साताऱ्यासाठी शरद पवार यांच्याकडून शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

महाविकास आघाडीचं जागावाटपाचा तिढा सोडवलाय पण कोणत्या जागेवर कोणता उमेदवार दिला जाणार याची घोषणा करण्यात आली नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभा निवडणुकीसाठी 10 जागा सुटल्या आहेत त्यापैकी 7 उमेदवारांची घोषणा पक्षाकडून आधीच करण्यात आली होती. आज तिसरी यादी जाहीर करत पक्षानं आणखी दोन उमेदवारांची घोषणा केली.

या दोन उमेदवारांसह शरदचंद्र पवार गटाकडून एकूण ९ उमेदवारांचे नावे जाहीर करण्यात आली आहेत. साताऱ्यातून शशिकांत शिंदेंना आणि रावेरमधून श्रीराम पाटलांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. यात मात्र माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये. मंगळवारी महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला.

जागावाटप जाहीर झाला असला तरीही महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांकडून अद्याप काही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. यादरम्यान आज शरद पवार गटाने लोकसभा निवडणुकांसाठी तिसरी यादी जाहीर केलीय. यासंदर्भात ऑफिशिअल सोशल मीडियाच्या एक्स या प्लॅटफॉर्मवर ट्विटर हँडलवरुन ट्वीट केलंय.

काय आहे माढाचा तिढा

शरद पवार गटाकडून आतापर्यंत 3 याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. 10 पैकी 9 जागांवर पक्षाकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आलीय. आता फक्त माढ्याचा जागेचा तिढा कायम आहे. माढ्यातून भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा संधी दिलीय. अशातच आता पवार आपला कोणता हुकुमी एक्का लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Maharashtra Election
Ajit Pawar: आधी साहेबांना..मग मुलीला मतदान केलं, आता सुनेला निवडून द्या; अजित पवारांची पत्नीसाठी बारामतीत फिल्डिंग

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com