Varsha Gaikwad: मोठी बातमी! वर्षा गायकवाड घेणार काँग्रेस हायकमांडची भेट; उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी मिळणार?

Maharashtra Politics News: जागा वाटपाबाबत पक्षाने विचारात घेतले नसल्याचे सांगत मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. अशातच आता वर्षा गायकवाड यांनी दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे.
Varsha Gaikwad
Varsha GaikwadSaam tv

गिरीश कांबळे, मुंबई|ता. १२ एप्रिल २०२४

Varsha Gaikwad Press Conference:

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपांवरुन अंतर्गत धुसफूस पाहायला मिळत आहे.  सांगली आणि मुंबईतील जागा वाटपावरुन काँग्रेसमधील नाराजी दूर झालेले नाही. मुंबईमधील जागा वाटपाबाबत पक्षाने विचारात घेतले नसल्याचे सांगत मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. अशातच आता वर्षा गायकवाड यांनी दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे.

काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?

"माननीय उद्धव ठाकरे, शरद पवार तसेच मल्लिकार्जुन खरगे साहेब यांच्याशी आमचा नेहमी संपर्क असतो. मल्लिकार्जुन खरगे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत. आमचे काही प्रश्न आहेत या संदर्भात आम्हाला दिल्लीला जायचं आहे. मात्र मल्लिकार्जुन खरगे हे उमेदवारी अर्ज भरायला गुलबर्गा या ठिकाणी गेले आहेत, ⁠त्यामुळे त्यांची वेळ मिळताच आम्ही दिल्लीला जाणार आहे," असे वर्षा गायकवाड यावेळी म्हणाल्या.

"त्याचबरोबर येणाऱ्या काळात आम्ही महाविकास आघाडी म्हणून कामाला सुरूवात करणार आहोत. मुंबईतील सहाही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार कसे निवडून येतील, यासाठी प्रयत्न करु. तसेच त्यासाठी काँग्रेसकडून सर्वतोपरी सहकार्य करु," असेही वर्षा गायकवाड यावेळी म्हणाल्या.

Varsha Gaikwad
Shahu Maharaj News: दत्तक शाहू महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांचं नेमकं नातं काय?

उत्तरमध्य मुंबईतून उमेदवारी मिळणार?

दरम्यान, उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीबाबत चाचपणी सूरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर या जागेवरुन माजी आमदार नसीर खानही लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठींसोबत चर्चेनंतर काय निर्णय होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Varsha Gaikwad
Nitesh Rane : जिथे कमी लीड तिथे निधीही कमी देणार, तक्रार करायची नाही; नितेश राणेंचा मतदारांना इशारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com