लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणुका कशा लढवायच्या असा प्रश्न काँग्रेससमोर आहे. गेल्या महिन्यात काँग्रेसची बँक खाती आयकर विभागाने गोठवली आहेत. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी पुरेसा फंड काँग्रेसकडे नाही. मात्र जाणूनबुजून निवडणूक एकतर्फी करण्यासाठी हे सगळं केलं जातंय आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत भाजप सरकारवर निशाणा साधला आहेत.
इलेक्टोरल बाँड्स आणि काँग्रेसच्या बँक खात्यावर आयकर विभागाच्या कारवाईबद्दल मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं की, म्हणाले की, केंद्र सरकार काँग्रेसला असहाय्य बनवून निष्पक्ष निवडणुकांच्या गप्पा मारत आहे. आमची बँक खाती रिलीज केली पाहिजेत, असं खरगे यांनी म्हटलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षाने हजारो कोटी रुपये जमा केले आहेत. दुसरीकडे विरोधकांच्या बँक खात्यात जे पैसे आहे, ते खर्च करणेदेखील शक्य नाही. बँक खाती गोठवल्याने पैशांअभावी बरोबरीने निवडणूक लढवता येत नाही, असं मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)
भाजपने इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून काही कंपन्यांकडून पैसे घेतले आहेत. सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाची चौकशी करत असल्याने लवकरच सत्य आपल्या समोर येईल अशी आशा आहे. मी संवैधानिक संस्थांना आवाहन करतो की जर त्यांना निष्पक्ष निवडणुका हव्या असतील तर त्यांनी आम्हाला आमच्या बँक खात्यातील पैशांचा वापर करण्याची परवानगी द्यावी, असं मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं.
सर्व राजकीय पक्षांना समान संधी मिळणे हे लोकशाहीसाठी महत्त्वाचे आहे. ईडी, आयटी आणि इतर स्वतंत्र संस्थांवर कोणतेही नियंत्रण नसावे. आम्ही न्यायालयाच्या अंतिम निर्णयाची वाट पाहत आहोत. आम्हाला अपेक्षा आहे की न्यायालय आम्हाला न्याय देईल. भाजप एकतर्फा निवडणूक करू इच्छित आहे. पण लोक हे सगळं समजून आहे, असं मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं.
काँग्रेसला फंड मिळू नये असं भाजपला वाटत आहे. म्हणूनच त्यांनी आमचे बँक अकाऊंट फ्रिज करायला सांगितल. इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून काँग्रेसला फक्त ११ टक्के फंड मिळाले. इलेक्टोरल बाँड्सचा फायदा फक्त भाजपला झाला. दुसरीकडे आमची म्हणजे मुख्य विरोधी पक्षाची खाती गोठवली जात आहेत, असं सोनिया गांधी यांनी म्हटलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.