Mahrashtra Election: मी वादळात उभा आहे, तुम्ही सोबत राहणार का? उद्धव ठाकरेंची परभणीकरांना साद

Mahrashtra Election: मी वादळात उभा आहे, तुम्ही सोबत राहणार का? उद्धव ठाकरेंची परभणीकरांना साद

Uddhav Thackeray Rally : परभणीचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंनी सभा घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोग, पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केलाय.

Uddhav Thackeray Rally In Parbhani Loksabha : मी वादळात उभा आहे, मी संकटात उभा आहे, तुम्ही वादळात उभे राहाल का, अशी भावनीक साद उद्धव ठाकरेंनी परभणीकरांना घातली. परभणीचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंनी सभा घेतली. यासभेत बोलतना उद्धव ठाकरेंनी भाजप, पीएम मोदी, निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या गीतातील 'जय भवानी' शब्द आक्षेप घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी, अमित शहांवर तोफ डागली.

परभणी माझ्या शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. तुम्ही सर्व त्याचे सैनिक आहात. भाजपला असं वाटलं असेल, मिंध्यांना असं वाटलं असेल की, सर्व काही पैशांनी खरेदी करता येत पण परभणीकर पैशांनी विकले जाऊ शकत नाहीत. हे शिवसेना प्रमुखांनी कमवलेलं प्रेम आहे जे आशीर्वादाच्या रुपाने माझ्या समोर बसलंय. ही आपली परीक्षा आहे. वादळालासुद्धा अंगावर घ्यायला मर्दाची छाती लागते ती आपल्याकडे आहेत. आम्ही पाठीवर वार करत नाहीत. आम्ही वादळाच्याही छातीवर वार करणारे शिवरायांचे मावळे आहोत”, असं म्हणत उद्धव ठाकरे म्हणालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com