Loksabha Election: 'धाराशिव'वरुन महायुतीत वादाची ठिणगी! अर्चना पाटील यांच्या उमेदवारीला विरोध; शिवसेना शिंदे गट आक्रमक

Maharashtra Politics: धाराशिवमधून अर्चना पाटील यांच्या उमेदवारीला शिवसेना शिंदे गटाने जोरदार विरोध केला असून आज धाराशिवचे शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.
Mahayuti
Mahayuti Saam TV
Published On

बालाजी सुरवसे, धाराशिव|ता. ८ एप्रिल २०२४

Dharashiv Loksabha Constituency News:

महायुतीमध्ये धाराशिव लोकसभेची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे देण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून भाजप आमदार राणाजगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र अर्चना पाटील यांच्या उमेदवारीला शिवसेना शिंदे गटाने जोरदार विरोध केला असून आज धाराशिवचे शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, धाराशिव लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे (NCP) गेल्याने शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिंदे गटाकडून अर्चना पाटील यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध पाहायला मिळत असून धाराशिवची जागा शिवसेनेची हक्काची असुन ती परत घ्यावी अशी भुमिका शिवसेना शिंदे गटाने घेतली आहे.ॉ

याच मागणीसाठी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या नेतृत्वात शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेणार आहेत. यासाठी धाराशिव जिल्ह्यातुन 25 हजार शिवसैनिक 3 हजार गाड्यांचा ताफा घेवुन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. धाराशिवमधून आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत लोकसभेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे आता एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Mahayuti
Maharashtra Weather Forecast: मराठवाडा आणि विदर्भावर अवकाळी पावसाचं संकट कायम! हवामान विभागाच अंदाज काय सांगतो?

दरम्यान, राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचा धुरळा पाहायला मिळत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामटेक लोकसभेतील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. मुख्यमंत्री शिंदेंची सकाळी पारशिवनी येथे जाहीर सभेला करणार संबोधित तर दुपारी रामटेकमध्ये सभा होणार आहे. (Maharashtra Loksabha Election 2024)

Mahayuti
Lok Sabha 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विदर्भात; चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचाराचं रणशिंग फुंकणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com