PM Modi: पंतप्रधान मोदी आज पुन्हा विदर्भात; नागपूरमध्ये घेणार प्रचार सभा

PM Narendra Modi Sabha At Nagpur: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांची नागपूर जिल्ह्यातील कन्हान इथे आज सभा होणार आहे.
PM Narendra Modi Sabha
PM Narendra Modi Sabha Saam Tv

पराग ढोबळे साम टीव्ही, नागपूर

Maharashtra Lok Sabha Election PM Modi Nagpur Visit

नागपूर जिल्ह्यातील कन्हान इथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा (PM Narendra Modi Sabha At Nagpur) होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा विदर्भ दौऱ्यावर आहेत. कन्हानमधील ब्रुक बाँड या बंद पडलेल्या चहा कंपनीच्या 18 एकराच्या आवारात ही सभा होणार आहे. विदर्भात पहिल्या टप्प्यात चंद्रपूरनंतर नागपूरातील कन्हान येथे मोदींची दुसरी प्रचार सभा (PM Narendra Modi Sabha) होत आहे.  (Maharashtra Lok sabha Election)

रामटेक लोकसभा मतदार संघात ही सभा (PMModi) होत आहे. परंतु, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शिंदे सेनेचे राजू पारवे यांच्या प्रचारार्थ महायुतीसाठी ही सभा होत असल्याची माहिती मिळत आहे. महायुतीचीच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा महत्त्वाची ठरणार आहे. काल होऊ घातलेल्या सभेतून नुकतेच राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा (Maharashtra Lok Sabha Election) दिला. त्यानंतर आता त्या अनुषंगाने काय बोलतात, याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रामटेक लोकसभा मतदार संघातील कन्हान येथे आज मोदींची प्रचार सभा पार पडणार (Maharashtra Election) आहे. नागपूर लोकसभा क्षेत्रातील उमेदवार नितीन गडकरी, रामटेकमधील राजू पारवे आणि भंडारा गोंदिया मतदार संघातील सुनील मेंढे यांच्या करीत एकत्रित प्रचार सभा होणार आहे. आजच्या दोन लाखांच्या घरात नागरिक सहभागी होण्याची शक्यता (Maharashtra Politics) आहे.

तर आजच्या सभेवर पावसाचे सावट असणार आहे. ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. अनेक रस्त्यांवर वाहतुकीत बदल होणार आहे. काही मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे.राज्यात लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चांगलीच (PM Modi Nagpur Visit) रणधुमाळी पाहायला मिळत आहे. विदर्भात आज मोदींची दुसरी सभा पार पडत आहे.

PM Narendra Modi Sabha
Maharashtra Politics: भाजपला निवडणुकीदरम्यान हिंसाचाराची गरज पडते; संजय राऊतांचा गंभीर आरोप

राज्यात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला (Lok Sabha 2024) आहे. ८ एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींची सभा चंद्रपूरमध्ये पार पडली होती. या सभेतून त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं होतं. लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा (Lok Sabha) घेत आहेत.

PM Narendra Modi Sabha
Maharashtra Politics 2024 : नाशिकनंतर आता पालघरवरही दावा; लोकसभेच्या जागावाटपावरून शिंदे गट पुन्हा आक्रमक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com