Amol kolhe News: शिवाजीराव आढळराव पाटील यांचा आज राष्ट्रवादीत प्रवेश? अमोल कोल्हेंचा खोचक टोला; म्हणाले..

Maharashtra Loksabha Election 2024: शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादीमधून घड्याळ्याच्या चिन्हावर लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आज त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार असल्याचेही बोलले जात आहे.
Shivajirao Adhalarao Patil On Amol Kolhe
Shivajirao Adhalarao Patil On Amol KolheSaamtv

सचिन जाधव, पुणे|ता. २३ मार्च २०२४

Shirur Loksabha Constituency News:

गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये सुरू असलेला शिरुर लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शिरुरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादीमधून घड्याळ्याच्या चिन्हावर लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आज त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार असल्याचेही बोलले जात आहे. यावरुन शिरुरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले अमोल कोल्हे?

"शिरुरमध्ये बेडूक उड्या विरुद्ध एकनिष्ठता अशी लढत आहे. आढळराव पाटील यांना चौथ्या पक्ष प्रवेशाच्या मनपूर्वक शुभेच्छा. राजकीय ताकदवान नेत्यांना उमेदवार आयत करावं लागणं हेच माझे यश आहे. केवळ पदासाठी सुरू असलेले तडजोडीचे राजकारण जनता बघत आहे, असे म्हणत समोर काय आहे? कोण आहे? याचे आव्हान करत नाही," असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी लगावला.

पिक्चर अभी बाकी है...

तसेच "अजित दादा मोठे नेते आहेत, इतक्या मोठ्या नेत्यांना आव्हान दिल्यानंतर उमेदवार आयत करावे लागत असेल तर सर्वसामान्य जनतेची भावना लक्षात आली असेल. महायुतीमध्ये सगळ काही आलबेल नाही. हेच विजय शिवतारे यांच्या भूमिकेनंतर कळते. असे म्हणत निलेश लंके यांच्या उमेदवारीवरुन बोलताना एक मोहीम पार पडली, ये तो सिर्फ ट्रेलर है,पिक्चर अभी बाकी है हेच म्हणव लागेल," असे सूचक वक्तव्यही अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केले आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shivajirao Adhalarao Patil On Amol Kolhe
Ravikant Tupkar: रविकांत तुपकर यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा; २ एप्रिलला बुलढाण्यातून अर्ज भरणार

कांदा निर्यातबंदीवरुन केंद्र सरकारवर टीकास्त्र

"केंद्र सरकारने आज पुन्हा 31 मार्चपर्यंत कांदा निर्णयात बंदीचे नोटिफिकेशन काढलं आहे. याचाच अर्थ सरकारचा शेतकरी विरोधी धोरणाचा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. महाराष्ट्रातले दिगग्ज नेते जागावाटपासाठी वारंवार दिल्लीच्या वाऱ्या करतात, परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी आवाज उठवायला त्यांच्याकडे वेळ नसावा, हे खरोखर दुर्देव आहे. केंद्र सरकारच्या या शेतकरी विरोधी निर्णयाचा मी निषेध करतो, या निर्णयाने मोदी सरकारचा शेतकरी विरोधी चेहरा समोर आला," अशी टीकाही अमोल कोल्हे यांनी केली. (Latest Marathi News)

Shivajirao Adhalarao Patil On Amol Kolhe
Buldhana Crime News : संतापजनक! अंगणवाडी सेविकेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करून मारहाण; ३ आरोपींवर गुन्हा दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com