Maharashtra Politics: लोकसभेत 'बिनशर्त' पाठिंबा देणाऱ्या मनसेला विधानसभेला मोठा फायदा होणार!

Raj Thackeray Supports Mahayuti: मनसे प्रमुख राज ठाकरेंनी महायुतीला लोकसभेत बिनशर्त पाठिंबा दिला आहे. याचा मोबदला राज ठाकरेंना भविष्यात मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Raj Thackeray Supports Mahayuti
Raj Thackeray Supports Mahayuti Saam Tv

सुरज मसुरकर साम टीव्ही,

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी आधी चर्चा केली असती तर कदाचित लोकसभेला जागा (Lok Sabha Election) मिळाल्या असत्या. शेवटी चर्चेस आल्यामुळे राज ठाकरेंच्या प्रमाणे बोलणी होऊ शकली नाही, अशी वरिष्ठ सूत्रांनी साम टिव्हीला खात्रीलायक माहिती दिली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरेंसाठी महायुतीचं दार खुलं असल्याची माहिती मिळत आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरेंनी महायुतीला लोकसभेत बिनशर्त पाठिंबा (Raj Thackeray Supports Mahayuti) दिला आहे. याचा मोबदला राज ठाकरेंना भविष्यात मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विधानसभेत मनसेला महायुतीत चांगल्या जागा मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज ठाकरे चर्चेस शेवटी आल्यामुळे बोलणी होऊ शकली नसल्याचं सुत्रांनी (Maharashtra Politics) सांगितलं आहे.

महायुतीला बिनशर्थ पाठिंबा दिल्यानंतर लोकसभा निवडणुकीत मनसेला (MNS) एकही जागा मिळाली नाही. परंतु विधानसभेसाठी राज ठाकरेंना चांगल्या जागा मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) पाठिंब्यानंतर महायुतीची ताकद आणखी वाढलेली आहे. त्यामुळे आता मनसेला विधानसभेमध्ये चांगलं स्थान मिळण्याची शक्यता आहे. लोकसभेत 'बिनशर्त' पाठिंबा देणाऱ्या मनसेला विधानसभेला मोठा फायदा होणार असल्याची माहिती मिळत आहे.

Raj Thackeray Supports Mahayuti
Raj Thackeray: ...कोणताही पुरावा नाही, २००८ मधील हिंसाचार प्रकरणातील राज ठाकरेंविरोधातील गुन्हा हायकोर्टाने केला रद्द

राज्यात लोकसभा निवडणुकांचा धुराळा उडाला आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी (Assembly Election) पाहायला मिळणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभेसाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. परंतु राज ठाकरे यांनी उशीरा चर्चा केल्यामुळे त्यांना लोकसभेत जागा मिळाल्या (Raj Thackeray News) नाहीत. याचा मोबदला त्यांना विधानसभेत मिळणार, अशी माहिती साम टीव्हीच्या सुत्रांनी दिली आहे. मुंबईत विधानसभेच्या ३६ जागा आहेत. आता विधानसभेसाठी महायुतीचा मास्टर प्लॅन काय? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Raj Thackeray Supports Mahayuti
Rahul Shewale Meet Raj Thackeray News : राहुल शेवाळे घेणार राज ठाकरे यांची भेट, महायुतीच्या सभेसाठी आग्रही

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com