Maharashtra Politics: होर्डिंग पडून लोकांचा मृत्यू, त्याचठिकाणी रोड शो...अमानुष गोष्ट; राऊतांचा PM मोदींवर हल्लाबोल

Sanjay Raut Criciticized PM Modi: मुंबईमध्ये पंतप्रधान मोदींनी काल रोड शो केला. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका केली आहे.
संजय राऊत
Sanjay Raut Criciticized PM Modi:Saam Tv

मयूर राणे, साम टीव्ही मुंबई

लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये पंतप्रधान मोदींनी काल रोड शो केला. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका केली आहे. जिथे होर्डिंग कोसळून १६ लोकांचा मृत्यू झाला. त्याठिकाणी पंतप्रधान मोदींनी रोड शो केला. यापेक्षा अमानुष गोष्ट नसल्याची टीका संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे.

काल मेट्रो, रेल्वे रस्ते सगळं बंद केलेलं होतं. हे सगळं कोणासाठी? अशा प्रकारचा प्रचार कधी देशात झाला नव्हता. असे कोणतेही पंतप्रधान या आधी पाहिले नाहीत.एका माणसाचा प्रचार सुरळीत व्हावा. यासाठी लोकांची गैरसोय करणारा पहिल्यांदा पाहिला असा घणाघात (Sanjay Raut Criciticized PM Modi) राऊतांनी केला आहे. मोठा होर्डिंग पडून ज्या ठिकाणी लोकांचा जीव गेला. त्या ठिकाणी पंतप्रधान रोड शो (Ghatkopar Hoarding Collapse) करतात, यापेक्षा अमानुष गोष्ट नाही अशी टीका त्यांनी केली आहे.

मुंबईतील रोड शोवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींवर हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी हे सरकार एक घटना बाह्य सरकार आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचार करत महाराष्ट्रात फिरत (Lok Sabha 2024) आहेत. जे दोन घटना बाह्यपक्ष बरखास्त व्हायला पाहिजे. ते प्रचार करत असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात आणि देशात सर्वात मोठा विरोध मोदी आणि शहा यांना होत आहे. ४ जूननंतर या देशात भाजपचे अस्तित्व राहणार की नाही? हा मोठा प्रश्न असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीला सन्मानाचा पद मिळावं, अशी बोचरी टीका देखील राऊतांनी केली आहे.

संजय राऊत
Sanjay Raut News: 'हेलिकॉप्टरमधून ९ बॅगा, CM शिंदेंकडून १२- १३ कोटींचे वाटप'; संजय राऊतांच्या आरोपाने खळबळ

हेलिकॉप्टरमधून खोके उतरवायचे पोलिसांच्या गाडीतून पैसे वाटायचे. खोटा योजना आणायच्या, हा त्यांचा जाहीरनामा असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे. घटनाबाह्य सरकारचा जाहीरनामा कशाला पाहिजे आहे? असा सवाल देखील यावेळी त्यांनी विचारला आहे.

संविधान बचावाची लढाई या लोकसभेमध्ये लढत असल्याचं वक्तव्य राऊतांनी माध्यमांशी बोलताना केलं (Maharashtra Politics) आहे. पंतप्रधान, गृहमंत्री, निवडणूक आयोग हे लोकं चोरांचे साथीदार आहेत, असा टोला संजय राऊतांनी केला आहे. देशात परिवर्तन आणायचं आहे. देशाच्या संविधानाचा बचाव करायचा आहे .

संजय राऊत
Sanjay Raut Letter : 'नाशिकमध्ये ८०० कोटींचा घोटाळा, जनतेच्या पैशांची लूट'; संजय राऊतांचं थेट PM मोदींना पत्र

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com