Loksabha Election: महादेव जानकरांच्या उमेदवारीला विरोध! परभणीची जागा भाजपनेच लढवावी; बबनराव लोणीकरांचे पक्षश्रेष्ठींना आवाहन

Maharashtra Politics Breaking News: परभणी लोकसभेची जागा मित्रपक्षाला न देण्याचे आवाहन आमदार बबनराव लोणीकर यांनी केले आहे. त्यामुळे अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजपा आमदार लोणीकर यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Babanrao Lonikar
Babanrao LonikarSaam TV

Parbhani Loksabha Constituency News:

परभणीची लोकसभेची मित्र पक्षाला देण्याचा चुकीचा निर्णय झाल्यास, ही जागा भाजपच्या हातातून जाण्याची भीती आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे परभणीची जागा भाजपकडेच राहावी असे आवाहन त्यांनी पक्षश्रेष्ठींना केले असून ही जागा कमळ या चिन्हावर लढल्यास दोन लाख मतांच्या फरकाने जिंकेल, असा दावाही त्यांनी केला आहे. (Maharashtra Loksabha Election 2024)

परभणी लोकसभा मतदार संघात जालन्यातील परतूर, मंठा, घनसावंगी,या दोन विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. या मतदार संघात गेल्या अनेक वर्षांपासून भाजप आमदार माजी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर कार्यरत आहेत. सध्या ही जागा राष्ट्रवादीला (NCP) सुटणार असून रासपच्या महादेव जानकर (Mahadev Jankar) यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी आणि भाजपा आमदार लोणीकर यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या मतदार संघात भाजपाचे (BJP) तीन आमदार असल्याने तसेच गेल्या पाच वर्षात भाजपाने विकास कामाच्या माध्यमातून ताकद वाढवली असल्याने या जागेवर आमदार बबनराव लोणीकर यांनी आपल्या मुलासाठी दावा ठोकला आहे. परभणी लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाने कमळ या चिन्हावर लढल्यास दोन लाख मतांच्या फरकाने जिंकेल, असे भाजप आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) म्हणाले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Babanrao Lonikar
Water Shortage : पाणी टंचाईच्या झळा; चारा टंचाई पेक्षा पाणी टंचाईने पशुपालकांना चिंता

तसेच परभणी लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे ३ आमदार, १७ जिल्हा परिषदेचे सदस्य, ६५ पंचायत समितीचे सदस्य, ९२ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य असून २ हजार २५० बूथवर भाजपाच्या दोन हजार कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करीत संघटन मजबूत केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रबळ भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपने मित्र पक्षाऐवजी स्वतःचा उमेदवार उभा करावा, असेही आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे. (Latest Marathi News)

Babanrao Lonikar
Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर पुढील महिन्यात सुनावणी; काय आहे प्रकरण?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com