Maharashtra Politics 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणात फतवा'राज'; महायुतीसाठी राज ठाकरेंचा हिंदूंना फतवा

Lok Sabha Election 2024 : मविआला मतदान कऱण्यासाठी मुस्लिमांनी फतवे काढल्यामुळे हिंदुंनीही भाजपला मतदान करण्यासाठी फतवा काढा असं विधान राज ठाकरेंनी पुण्याच्या सभेतून केलं होतं.
Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024Saam Digital

प्रवीण देवळेकर

मविआला मतदान कऱण्यासाठी मुस्लिमांनी फतवे काढल्यामुळे हिंदुंनीही भाजपला मतदान करण्यासाठी फतवा काढा असं विधान राज ठाकरेंनी पुण्याच्या सभेतून केलं होतं. त्यांच्या विधानाला फडणवीसांनी दुजोरा दिलाय. पुण्यात मशीदींमध्ये मविआला मतदान करण्यासाठी फतवे काढले जात असल्याचं फडणवीस म्हणालेत... दरम्यान राज ठाकरेंनी काढलेल्या फतव्यानंतर रंगलेल्या राजकारणाचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून..

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत धर्म आणि जातीवरून जोरदार प्रचार सुरू आहे. यातच आता 'वोट जिहाद'ची चर्चा सुरू झालीय. मशिदींमधून मुस्लीम मौलवी काँग्रेस उमेदवाराला मतदान करण्याचे फतवे काढत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी पुण्यातल्या सभेत केला. एवढंच नव्हे तर राज ठाकरेंनीही हिंदूंसाठी नवा फतवा काढलाय....हिंदुंनी महायुतीच्या उमेदवारांनाच भरघोस मतांनी विजयी करा असा फतवा राज ठाकरेंनी जाहीर सभेतून काढलाय..

दरम्यान राज ठाकरेंनी फतवा काढल्यानंतर संजय राऊतांनीही चोख प्रत्युत्तर दिलंय.. बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला किती यातना झाल्या असतील असं राऊतांनी म्हटलंय..तर भाजपने राज ठाकरेंना दिल्लीत फाईली दाखवल्यामुळे प्रचार करावा लागत असल्याचा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावलाय. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यानंतर भाजपने हिंदू-मुस्लीमचा मुद्दा अधिक तीव्र केलाय.

Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics: दादांची दमबाजी, सुप्रियाताईंची ढाल; निलेश लंकेसाठी सुळेंनी घेतला अजित पवारांशी पंगा, VIDEO

काँग्रेसचं सरकार आल्यास सर्वांची संपत्ती काढून मुस्लीमांमध्ये वाटली जाईल असं विधान पंतप्रधान मोदींनी प्रत्येक सभेत केलंय.देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी तर तेलंगाणामधील प्रचारादरम्यान मुस्लीम समाजाला दिलेलं 4 टक्के आरक्षण रद्द करणार असल्याचा इशारा दिलाय.इकडे महाराष्ट्रातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मशिदींमधून 'वोट जिहाद' राबवलं जात असल्याचा आरोप केलाय.

भाजपच्या याच प्रचाराची री ओढत राज ठाकरेंनी मशिदींमधील फतव्यांकडे हिंदू मतदारांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय..मात्र राज ठाकरेंनी काढलेल्या फतव्यामुळे किती धार्मिक ध्रुवीकरण होणार आणि महायुतीच्या उमेदवारांना त्याचा कितपत फायदा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेलं..

Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics: दादांची दमबाजी, सुप्रियाताईंची ढाल; निलेश लंकेसाठी सुळेंनी घेतला अजित पवारांशी पंगा, VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com