Loksabha Election 2024: लोकसभेचे धुमशान! दुसऱ्या टप्प्यातील अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; दिग्गज नेते करणार शक्तीप्रदर्शन

Maharashtra Politics Breaking News: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील नामांकन अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राज्यभरातील अनेक दिग्गज नेते आज शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
Maharashtra Lok Sabha Election News :
Maharashtra Lok Sabha Election News : Saam tv

पराग ढोबळे, नागपूर|ता. ४ एप्रिल २०२४

Loksabha Election 2024:

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. आज लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील नामांकन अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राज्यभरातील अनेक दिग्गज नेते आज शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नवनीत राणा यांच्यासह महाविकास आघाडीचे डॉ. अभय पाटील, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे नेते आज आपला अर्ज दाखल करणार आहेत

नवनीत राणांचा अर्ज, भाजपचे शक्तीप्रदर्शन...

अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा ह्या आज आपला नामांकन अर्ज दाखल करणार असून अमरावतीत भाजपाचं शक्तिप्रदर्शन पाहायला मिळणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज अमरावती भाजपच्या अधिकृत उमेदवार नवनीत राणा आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

अकोल्यात राजकीय राडा..

अकोल्यामध्ये आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar), काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील आणि भाजपचे माजी आमदार हे बंडखोरी करणार असून ते देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. प्रकाश आंबेडकरांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी मोठ शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे. तसेच काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अभय पाटील हे सुद्धा आजच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह जिल्ह्यातील मविआचे नेते उपस्थित असणार आहेत.

(Maharashtra loksabha Election 2024)

Maharashtra Lok Sabha Election News :
Navneet Rana: नवनीत राणा बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाचा आज फैसला; उमेदवारी राहणार की जाणार? राजकीय वर्तुळाचे लक्ष

हिंगोली मुख्यमंत्र्यांचे शक्तीप्रदर्शन..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत. महायुतीचे उमेदवार बाबुराव पाटील कोहळीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या वतीने भव्य रॅली व शक्तिप्रदर्शन देखील करण्यात येणार आहेत.

यवतमाळ- वाशिममध्ये नेमकं कोण उमेदवार?

दुसऱ्या टप्प्यात यवतमाळ वाशिम या मतदारसंघातून शेवटपर्यंत कोणाला उमेदवारी मिळते याकडे लक्ष लागले आहे. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजर्षी पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नक्की कोणाला उमेदवारी दिली गेली आहे, हे आज स्पष्ट होणार आहे.

बुलढाण्यात आदित्य ठाकरेंचे शक्तीप्रदर्शन..

त्याच बरोबर महाविकास बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडकर हे सुद्धा आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या उपस्थितीत नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. थोडक्यात आज दिवसभरात राजकीय रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Lok Sabha Election News :
Parbhani News: परभणीत माकडांच्या टोळीचा हैदोस... हल्ल्यामध्ये १०- १५ जण जखमी; गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com