Maharashtra Election: साताऱ्याचा तिढा कसा सुटला? ट्विस्टमागील इनसाइड स्टोरी आणि कारण आलं समोर

Satara Election : जागावाटपाच्या वादावरून यंदाची लोकसभा निवडणूक खूप चर्चेत आहे. महायुती असो किंवा महाविकास आघाडी दोन्ही गटामधील पक्षांमध्ये जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू होती. आमचं सर्व आलबेल आहे, एकमत आहे, असं म्हणणाऱ्या महायुतीचंही जागावाटपाचं घोडंही अनेक ठिकाणी अडकलं होतं. त्यातील एक जागा म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघ.
BJP- NCP Satara Constituency Inside Story
BJP- NCP Satara Constituency Inside StorySaam Tv

(सुरज मसूरकर)

BJP- NCP Satara Constituency Inside Story :

साताऱ्यातून महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. त्यांची लढत शशिकांत शिंदेशी होणार आहे. विशेष म्हणजे साताऱ्याच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपही आग्रही होते. दोन्ही पक्षात या जागेवरून रस्सीखेच सुरू होता. शेवटी ही जागा भाजपला सुटली. पण साताऱ्याचा हा तिढा कसा सुटला? याचं गुपीत बाहेर आलंय.

जागावाटपाच्या वादावरून यंदाची लोकसभा निवडणूक खूप चर्चेत आहे. महायुती असो किंवा महाविकास आघाडी दोन्ही गटामधील पक्षांमध्ये जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू होती. आमचं सर्व आलबेल आहे, एकमत आहे, असं म्हणणाऱ्या महायुतीचंही जागावाटपाचं घोडंही अनेक ठिकाणी अडकलं होतं. त्यातील एक जागा म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघ.

साताऱ्याच्या जागावाटपावरुन महायुतीत रस्सीखेच सुरू होती. उमेदवारी आणि जागा कोणाला मिळावी यावरून वाद होता. त्यामुळे भाजपने अखेरच्या टप्प्यात खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर केली. या मतदारसंघासाठी अजित पवार पहिल्यापासून आग्रही होते. या मतदारसंघावर आमचाच नैसर्गिक हक्क आहे, असा दावा राष्ट्रवादीकडून केला जात होता. परंतु उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देत हा तिढा सुटला. आता या मतदारसंघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे आणि उदयनराजे यांच्यात ‘हाय होल्टेज’ लढत रंगणार आहे.

दरम्यान, या मतदारसंघासाठी अजित पवार पहिल्यापासून आग्रही होते. या मतदारसंघावर आमचाच नैसर्गिक हक्क आहे, असा त्यांचा दावा होता. तर भाजपही या जागेसाठी आग्रही होती. तर उमेदवारीसाठी उदयनराजे यांनीही भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे तगादा लावला होता. उदयनराजे यांनी ही निवडणूक भाजपकडून न लढवता, त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव अजित पवार यांच्या गटाने दिला होता.

मात्र आपण भाजपच्याच चिन्हावरून निवडणूक लढवणार असल्याचं उदयनराजे यांनी स्पष्ट केलं. उदयनराजे यांनी आपली मागणी लावून धरल्याने भाजपने तेथील उमेदवारी जाहीर केली. दरम्यान ही जागा राष्ट्रवादीच्या हक्काची होती. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १९९९ पासून लोकसभा निवडणूक लढवत आहे. मात्र यंदा ही जागा भाजपचे उदयनराजे भोसले यांना देण्यात आलीय. या जागेवर भाजपने आपला उमेदवार कसा दिला. साताऱ्याचा तिढा कसा सुटला याची गुपित बाहेर आली आहेत. अजित पवार गट राष्ट्रावादी काँग्रेस आणि भाजपने या जागेसाठी एक ठराव पास केलाय.

सातारा लोकसभेच्या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यसभेची जागा देण्यात येणार आहे. या जागेच्या बदल्यात पियुष गोयल यांची राज्यसभेची जागा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सुरुवातीला भाजपकडून उदयनराजे यांची राज्यसभेची उर्वरित टर्म असणारी जागा घ्या, असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने याला कडाडून विरोध केला. त्यानंतर भाजपकडून पियुष गोयल यांची राज्यसभेची जागा मागून घेण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

BJP- NCP Satara Constituency Inside Story
Vishal Patil: हा जनतेचा लढा, माघार हा पर्याय नाही; विशाल पाटील यांनी व्यक्त केली नाराजी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com