Today's Marathi News Live: संविधान वाचवण्यासाठी एकत्र लढावं लागेल, शरद पवार यांंचं आवाहन

Maharashtra chya Tajya Marathi Batmya Live 30 march 2024: महाराष्ट्रासह देश विदेश, मनोरंजन तसेच क्रीडा क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी वाचा फक्त एका क्लिकवर
Maharashtra chya Tajya Marathi Batmya Live 30 march 2024
Maharashtra chya Tajya Marathi Batmya Live 30 march 2024Saam Tv

संविधान वाचवण्यासाठी एकत्र लढावं लागेल, शरद पवार यांंचं आवाहन

मागच्या चाळीस वर्षांपासून आपण इथे भेटतो

हा चांगला दिवस आहे, दूनियाच्या भालाई चे विचार करतो

देशात भाईचारा ठेवलाय ला हवी, एकता असायला हवी

बाबासाहेबांनी संविधानाची देणं दिलीय, ती जपायला हवी

आज देश ज्यांच्या हातात आहे , चिंता वाटते

त्यांनी म्हांटल की देशाच्या संविधानात परिवर्तन करायचं आहे

हुकिमशहीची स्थिती देशात निर्माण व्हायला नको

देशाच्या या स्थितीचा सामना करावा लागेल, सोबत राहावे लागेल

दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण बंडखोरीच्या पवित्र्यात

हरिश्चंद्र चव्हाण होते भारतीय जनता पार्टी कडून दिंडोरी लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार

भाजपने भारती पवार यांना उमेदवारी दिल्यानंतर हरिश्चंद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडूनही उमेदवारीसाठी केला होता प्रयत्न

मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटांनीही भास्कर भगरे यांना उमेदवारी दिल्याने हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष उमेदवारी करणार

हरिश्चंद्र चव्हाण यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी केल्यास भाजपच्या भारती पवार यांना बसणार फटका

विद्यमान खासदार असताना हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी कापून भारती पवारांना मागील निवडणुकीत दिली होती उमेदवारी

यवतमाळच्या उमरखेडमध्ये मुसळधार पावसासह वादळाचा तडाखा

यवतमाळच्या उमरखेड परिसरात चक्रीवादळ सह कुठे हलका तर कुठे गारासदृश्य मुसळधार पाऊस झाला असून यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. यवतमाळच्या दिग्रस मध्ये काल रात्री दरम्यान मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यातच दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत.

राष्ट्रवादी शरद पवार गटाची लोकसभेची यादी जाहीर

वर्धा- अमर काळे

दिंडोरी - भास्करराव भगरे

बारामती- सुप्रिया सुळे

शिरुर - डॅा. अमोल कोल्हे

दक्षिण नगर - निलेश लंके

भाजपला पराभूत करण्यासाठी समविचारी लोकांनी एकत्र लढण्याचा निर्धार केला पाहिजे. काही लोक जर वेगळे लढण्याचा विचार करत असेल तर समविचारी मतांमध्ये विभागणी होईल. त्यामुळे सर्वांनी एकसंधपणे लढलं पाहिजे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

पंकजा मुंडेंनी घेतली आमदार योगेश क्षिरसागर यांची भेट

भाजप नेत्या पंकजा मुंडे या, बीड लोकसभेचे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता गाठीभेटी दौरा करत आहेत. त्या आज बीड शहरातील आजी माजी आमदारांसह विविध नेत्यांच्या घरी भेटी देत आहेत. त्यांनी क्षीरसागर यांच्या बंगल्यावर/ निवासस्थानी देखील भेट दिली आहे. यावेळी अजित पवार गटाचे नेते योगेश क्षीरसागर यांनी कुटुंबासमवेत पंकजा मुंडे यांचे स्वागत केले. दरम्यान यावेळी आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा देखील झाली.

उत्तन डंपिंग ग्राउंडला आग,  चारचाकी वाहन जळून खाक

उत्तन परिसरात असणाऱ्या कचऱ्याच्या डम्पिंग ग्राउंडला दुपारी ०२ च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे.

आगीवर अद्याप नियंत्रण मिळवले गेलेले नाही.

आग भीषण असून त्यात एक चारचाकी गाडी देखील जळल्याची घटना समजत आहे.

आगीमुळे आजजुबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे वातावरण निर्माण झाले असून परिसरातील लोक त्याला त्रस्त झाले आहेत.

अग्निशामक दल घटनास्थळीं हजर झाले असून आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.डम्पिंग ग्राऊंडला आग लागण्याच्या घटना या अगोदर देखील अनेकदा घडल्या आहेत.

परभणीतून लोकसभेसाठी उमेदवार ठरला, सुनील तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं

महायुतीच जागा वाटप वेळोवेळी चर्चा सुरू आहे

भाजपने २४ उमेदवार घोषित केले. शिंदे गटाने ८ जागांवर उमेदवार घोषित केले

रायगड आणि शिरूर जागांवर अजित पवार यांनी घोषणा केली आहे

आम्ही ७-८ जागा मागितल्या आहेत

सकारात्मक चर्चा सुरू आहे

परभणीची जागा मागितली होती

अमित शहा यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत ही जागा आम्हाला देण्याचं ठरलं आहे

महायुतीच हित लक्षात घेता ही जागा महादेव जाणकारांना देण्याच ठरल आहे

राष्ट्रीय समाज पक्ष ही जागा लढवतील महायुतीचे उमेदवार म्हणून

जांकरांच मोठ योगदान राहिलं आहे

परभणी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतला

नाशिक बाबत अद्याप वेट अँड वॉच ची भूमिका आहे

लोकसभेसाठी भाजपची जाहीरनामा समिती गठीत

२०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची जाहीरनामा समिती गठीत करण्यात आली आहे. २७ सदस्यांची समिती लोकसभेचा जाहीरनामा तयार करणार असून राज्यातून पियूष गोयल, विनोद तावडे यांचा समावेश आहे. लवकरच भाजपचा जाहीरनामा होणार प्रसारित होणार आहे.

महादेव जानकर परभणीतून लोकसभा निवडणूक लढवणार

महादेव जानकर महायुतीसोबत गेल्यानंतर ते कोणत्या मतदारसंघातून निडणूक लढणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नव्हतं, मात्र स्वत: महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचं म्हटलं आहे.

मनोज जरांगेंच्या भेटीसाठी वसंत मोरे अंतरवाली सराटीत

नुकताच मनसेला जय महाराष्ट्र करून स्वबळावर अपक्ष लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेले वसंत मोरे अंतरवालीत दाखल झाले आहेत. वसंत मोरे यांनी आज अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची भेट घेतलीय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोरे जरांगेंच्या भेटीला दाखल झालेत. वसंत मोरे मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. या वेळी मोरे यांनी संपूर्ण मतदारसंघाचा अहवाल देखील सोबत आणला आहे.

कर्तव्यावर असताना हृदयविकाराचा झटका आल्याने सैनिकाचा मृत्यू

अकोल्यातल्या कौलखेड भागात शोककळा पसरलाय. भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या नितीन सुरेश केने या सैनिकाचा मृत्यू झालाय. मूळ अकोल्यातील रहिवासी असलेले नितीन केने हे छत्तीसगड येथे कार्यरत असून सैनिक दलात ड्युटी बजावत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचं दुर्दैवी निधन झाले आहे. आज अकोल्यातल्या कौलखेड भागात त्यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव दाखल झालंय. आता अंतिम दर्शनानंतर कौलखेड इथल्या स्मशानभूमीत सैनिक नितीन केने यांच्यावर शासकीय इतामात अंतिमसंस्कार पार पडलाय. नितीन केनी यांच्या पश्चात त्यांची पत्नी एक मुलगा आई वडील अनेक लहान भाऊ असा आप्तपरिवार आहे.

निलेश लंके यांच्या राजीनाम्यावर सुजय विखेंची पहिली प्रतिक्रिया

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला.

आज महाविकास आघाडीच्या होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये निलेश लंके यांचे नाव अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून जाहीर होऊ शकते.

या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीमध्ये कोणी ना कोणी उमेदवार समोर येणारच आहे. आम्ही निवडणुकीची तयारी आधीपासूनच सुरू केली होती. जनतेपुढे नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकास कामांचे पुस्तक आम्ही ठेवणार आहोत, असं सुजय विखे म्हणाले.

आमदार निलेश लंके यांनी माझ्यावर केलेल्या टीकेला माझे कार्यकर्ते उत्तर देण्यास सक्षम असल्याचं विखे यांनी म्हटलं.

अहमदनगर लोकसभा निवडणुकीत आमचा विजय पक्का असल्याचा दावा खासदार सुजय विखे पाटील यांनी केला आहे.

निष्ठावंत शिवसैनिक प्रचार थांबविण्याच्या मनस्थितीत, सांगलीचा वाद कोल्हापुरात

सांगली लोकसभा मतदारसंघात चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याकडे फिरवलेली काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाठ त्याला कारणीभूत ठरली आहे.

जोपर्यंत काँग्रेसचे विशाल पाटील 'मशाल' हातात धरत नाहीत, तोपर्यंत शिवसेना ठाकरे गटाने महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे प्रचार थांबवावेत असे तोंडी आदेश 'मातोश्री'वरून निघाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.

त्याचे पडसाद आता कोल्हापुरातील शिवसेना ठाकरे गटातील प्रमुखांपेक्षा होम पिचवर लढणाऱ्या स्थानिक शिवसैनिकांमध्ये उमटत आहेत. जर सांगलीमध्ये महाविकास आघाडी म्हणून मदत करणार नसतील तर आपण ही मदत का करायची? अशी भावना कोल्हापुरातील शिवसैनिकांच्या मनात निर्माण होत आहे.

दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांना ईडीचे समन्स

दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांना ईडीने समन्स बजावलं आहे.

कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी ईडीने हे समन्स बजावलं आहे.

आज सकाळी ११ वाजता कैलाश गेहलोत यांना ईडी कार्यालयात चौकशीला बोलावलं आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, खासदार संजय सिंह यांच्यानंतर आपच्या आणखी एका नेत्याची चौकशी होण्याची शक्यता आहे.

एप्रिल अखेरपर्यंत होणार शाळांची तपासणी; तालुका निहायक पथकाची नियुक्ती

छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषद शाळेमध्ये गुणवत्ता तपासणी करण्यात येणार असून जिल्ह्यातील 2 हजार 131 शाळांची गुणवत्ता तपासणी केली जाणार आहे. यासाठी तालुका निहाय, शाळा संख्येनिहाय पथके ही नेमण्यात आली आहेत. त्यामुळें एप्रिल अखेर पर्यंत शाळांची तपासणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

नुकत्याच काही दिवसापूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास विना यांनी 4 शाळांना भेटी दिल्या होत्या. आणि या भेटीत 22 पैकी 21 विद्यार्थ्यांना संख्या वाचन आणि गणितीय क्रिया येत नसल्याचा धक्कादायक प्रकार आढळून आल्याने त्यांच्या गुणवत्तेवरून पाच शिक्षकांना प्राथमिक शिक्षणाधिकांनी नोटीस देखील बजावली होती.

त्यामुळे शिक्षणअधिकारी कार्यालयाने घडविकास अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात सर्व तालुक्यात पथके स्थापन केली असून उन्हाळी सुट्टी सुरू होईपर्यंत शाळांना भेटी देऊन तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही तपासत असल्याने आता शिक्षकांचे देखील धाबे दणाणले आहेत.

घाटी रुग्णालयातील डॉक्टर इलेक्शन ड्युटीवर; रुग्ण सेवेवर परिणाम होण्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगर शहरात असणाऱ्या घाटी रुग्णालयातील डॉक्टरांची इलेक्शन ड्युटी लावण्यात आली आहे. रुग्णालयातील एकूण 92 जणांना लोकसभा निवडणुकीसाठी मतदान अधिकारी आणि कर्मचारी म्हणून नेमणूक देण्यात आलीय. यामुळे घाटीतील रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे डॉक्टरांची इलेक्शन ड्युटी रद्द करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू असल्याचा पाहायला मिळत आहे. देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून जिल्ह्यात लोकसभेच्या निवडणुकीसाठी 13 मे रोजी मतदान होणार असून 4 व 5 एप्रिल रोजी निवडणुकीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

दरम्यान घाटीतील इलेक्शन ड्युटी लागलेल्या डॉक्टरांच्या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्याची भेट घेतली असून अत्यावश्यक सेवेतील इलेक्शन ड्युटी रद्द केली जाणार असल्याचे अधिष्ठातानी सांगितलंय.

वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबंत; शिंदे-फडणवीसांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये चर्चा सुरू आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात जागावाटपावरून खलबंत झाली.

छत्रपती संभाजी नगर, पालघर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा कोणता उमेदवार द्यावा, याबाबत तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.

दुसरीकडे ठाकरे गटाने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत आदित्य ठाकरे संजय राऊतांसह ४० दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. नागपूर, रामटेकसह पूर्व विदर्भातील पहिल्या टप्प्यातल्या पाच मतदारसंघातील अंतिम लढतीचं चित्र आज स्पष्ट होणार आहे.

पहिल्या टप्प्यातील निवडणूक असलेल्या मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. यासह देश विदेश आणि राजकीय क्षेत्रातील घडामोडीचा आढावा आपण या लाईव्ह ब्लॉगमधून घेणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com