Maharashatra Loksabha: पाठिंबा द्यायचा की उमेदवार जाहीर करायचा; उद्याच्या बैठकीत ठरणार

Amaravati Loksabha Election : भाजपने अमरावतीतून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केलीय. प्रहारचे आमदार बच्चू कडू उद्या अमरावती लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार किंवा पाठिंबा देणार याच्या निर्णयासंदर्भात बैठक घेणार आहेत.
Bachchu Kadu
Bachchu Kadu Saam Tv

(अमर घटारे, अमरावती)

Bachchu Kadu On Amaravati LokSabha Election Candidate :

भाजपमध्ये खासदार नवनीत राणा यांना प्रवेश देत त्यांना अमरावतीमधून उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. अमरावती मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास प्रहार संघटनादेखील इच्छुक होती. आता नवनीत राणा या भाजपच्या उमेदवार असल्याने बच्चू कडू त्यांना पाठिंबा देणार का? असा प्रश्न केला जात आहे. यावर उद्या दुपारी निर्णय घेतला जाणार असल्याचं विधान आमदार आणि प्रहार संघटनेचे प्रमुक बच्चू कडू यांनी केलंय. (Latest News)

बच्चू कडू यांच्या विधानामुळे ते महायुतीतून बाहेर पडणार का हे पाहावे लागेल.लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधीपासून राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यात वाद सुरू झाला होता. त्या वादात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत दोघांना समज दिली होती. आता लोकसभेच्या उमेदवारीवरून पुन्हा बच्चू कडूविरुद्ध राणा दाम्पत्य असा सामना रंगलाय. त्यात अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आलीय. या सर्व पार्श्वभूमीवर बच्चू कडू उद्याच्या बैठकीत काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलंय.

दरम्यान, नवनीत राणा यांच्या भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमरावतीत महायुतीच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झालाय. यामुळे बच्चू कडू यांच्या भूमिकेकडे महायुतीतील नेत्यांचे आणि अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.

उद्याच्या बैठकीसंदर्भात बच्चू कडू यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधलाय. २०० ते ३०० लोकांनी रक्तदान करून वर्धामधून लोकसभा निवडणूक लढावी यासाठी मागणी केलीय. यासाठी आपण त्यांचे आभार मानतो , नाहीतर जागेची मागणीही बिअर बारमध्ये बसल्यानंतर केली जाते. परंतु पक्षाच्या उमेदवारांनी रक्तदान करत शेतकऱ्यांच्या प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी आणि केंद्राच्या आयात निर्यात धोरणाविरोधात आवाज उठवण्यासाठी खासदार असावेत, यासाठी वर्ध्यातून निवडणूक लढवण्याची मागणी केली जातेय.

यावर सुद्धा उद्याच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. वर्ध्यातून निवडणूक लढवण्यात यावी का नाही, यासाठी तेथे दोन पथकं पाठवलीत. त्यांनी दिलेल्या अहवालाच्या अभ्यासातून वर्ध्याविषयी निर्णय घेतला जाईल. साधरण दोन तारखेपर्यंत तो अहवाल हाती येईल त्यानंतर निर्णय घेतला जाईल असं बच्चू कडू म्हणालेत. त्याचबरोबर अमरावतीच्या जागेसाठी उमेदवार द्यायचा का पाठिंबा द्यायचा याचा निर्णय उद्या होणार असल्याचं बच्चू कडू म्हणालेत.

Bachchu Kadu
Maharashtra Lok Sabha Election : बच्चू कडू यांच्या वक्तव्यावर नवनीत राणा यांची पहिली प्रतिक्रिया; महायुतीचा उल्लेख करत म्हणाल्या...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com