Maharashtra Election: पॅलेस, अलिशान गाड्या, शेतजमीन, सोन्याचे दागिने आणि बरंच काही; छत्रपती शिवरायांच्या वंशजांची संपत्ती किती?

Maharashtra Election : उदयनराजे भोसले आणि शाहू शाहू छत्रपतीं यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज भरलाय. या अर्जासह दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांच्या संपत्तीचा खुलासा केलाय.
Udayanraje Bhosale And  Shahu Chhatrapati  Maharaj Property
Udayanraje Bhosale And Shahu Chhatrapati Maharaj PropertySaam Tv

Udayanraje Bhosale And Shahu Chhatrapati Maharaj Property :

यंदाची लोकसभा निवडणूक देशासह राज्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी पार पडला. राज्यातील तिसरा मतदानाचा टप्पा अधिक रंजक असणार आहे. या टप्प्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन वंशज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपती महाराज यांना कोल्हापूरमधून उमेदवारी देण्यात आलीय. तर सातारा जिल्ह्यात उदयनराजे यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आलीय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचे संपत्ती काय हे जाणून घेऊ.

महाराष्ट्रात कोणत्याही सभेला किंवा भाषणाला सुरुवात होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जय घोष केला जातो. मग कोणत्याही पक्षाची सभा किंवा कोणत्याही पक्षातील नेता असो सर्वजण महाराजांचा जय घोष करत असतात. आता महाराजांचे वंशज निवचडणुकीच्या आखाड्यात उतरलेत. त्यामुळे जनता कोणाच्या बाजूने कौल देते ते पाहून औत्सुक्याचं ठरणार आहे.

दरम्यान गुरुवारी मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी अर्ज दाखल केला. त्यामध्ये साताऱ्याचे राजे आणि विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनीही उमेदवारी भरला. या अर्जासह त्यांनी जोडलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या संपत्तीची सखोल माहिती समोर आलीय. शाहू महाराजांच्या संपत्तीविषयीही माहिती समोर आलीय. दोघांकडे जमीन जुमला, सोन्या-नाण्याची आरास, गाडी-घोडा बंगला, राजेशाही थाट दिसून येतो.

साताराच्या गादीला आणि कोल्हापूरच्या गादीला महाराष्ट्रात मोठा मान आहे. विजयादशमीच्या सणाला पारंपारिक पद्धतीने राजेशाही पद्धतीने दोन्ही भोसले घराण्याचा दसरा पाहायला मिळतो. त्यावरुन दोन्ही राजेंच्या संपत्तीची आणि श्रीमंतीची चर्चाही होत असते. मात्र आता निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या संपत्ती विवरणपत्रातून दोन्ही राजेंची संपत्ती सार्वजनिक झालीय.

उदयनराजेंची संपत्ती

उदयनराजे, त्यांच्या पत्नी, मुले व भोसले कुटुंबांची एकूण संपत्ती २९६ कोटी ३९ लाख ११ हजार ५८५ रुपये इतकी आहे. त्यामध्ये उदयनराजेंच्या पत्नी व मुलांच्या संपत्तीचाही समावेश आहे. उदयनराजेंची एकूण स्थावर आणि जंगम संपत्ती १ अब्ज ९० कोटी ९३ लाख ६४ हजार ६३४ रुपये आहे. तर त्यांच्या पत्नीची एकूण संपत्ती स्थावर आणि जंगम मालमत्ता ६ कोटी ८९ लाख ४७ हजार २०१ रुपये इतकी आहे.

उदयनराजेंकडे १ कोटी ९० लाख ५ हजार १६५ रुपये किमतीच्या अलिशान गाड्या आहेत. यात दोन मर्सिडीज बेंझ, ऑडी -१, टोयाटो फॉरच्यूनर १, मारूती गिप्सी १, मारूती एस क्रॉस आणि दोन टॅक्ट्रर्स आहेत. उदयनराजे यांच्याकडे १७२ कोटी ९४ लाख ४९ हजार ६९१ रुपये किमतीची शेतजमीन आहे. तर पत्नीकडे ३ कोटी ७९ लाख ३७ हजार ५७० आणि मुलाच्या नावे ३ लाख १४ हजार ८२० रुपये किमतीची जमीन आहे.

भोसले कुटुंबीयांकडे २८ कोटी ७९ लाख ४८ हजार ५६५ रुपये किंमतीची शेतजमीन असल्याचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात करण्यात आलाय. उदयनराजेंकडे ३०, ८६३ ग्रॅम सोनं चांदी, त्यांच्या पत्नीकडे ४७५० ग्रॅम दागिने, कुटुंबाकडील सोने ६२८ ग्रॅम, तर मुलीचे सोनं ७०५४ ग्रॅम आहे. दरम्यान उदयनराजेंवर २ कोटी ४४ लाख ६३ हजार ८४२ रुपयांचे कर्ज आहे.

शाहू महाराजांची संपत्ती

शाहू छत्रपती यांच्या नावे स्थावर व जंगम अशी मिळून २९७ कोटी ३८ लाख ०८ हजार रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्या पत्नी याज्ञसेनीराजे छत्रपती यांच्या नावे ४१ कोटी ०६ लाखांची संपत्ती आहे. म्हणजेच शाहू महाराज आणि त्यांच्या पत्नीची एकूण संपत्ती ३३८ कोटी ४४ लाख ८ हजार इतकी आहे. शाहू महाराजांवरही कसलेही कर्ज नाही.

शाहू छत्रपतींची १४७ कोटी ६४ लाख ४९ हजार रुपयांची जंगम मालमत्ता, तर १४९ कोटी ७३ लाख ५९ हजारांची स्थावर मालमत्ता आहे. कोल्हापूरमध्ये ६५, ६१४ स्केअर फूटचे महल आहे. शाहू महाराज यांच्या पत्नी याज्ञसेनीराजे यांच्या नावे अनुक्रमे १७ कोटी ३५ लाख आणि २३ कोटी ७१ लाखांची जंगम व स्थावर मालमत्ता आहे. कोल्हापूरमध्ये पत्नीच्या नावे ५.७३ स्केअर फूटचा राधानगरी नावाचा बंगला आहे. तसेच चंपक नावाचा २०,६३२ स्केअर फुटाचा बंगलादेखील आहे.

शाहूंकडे १ कोटी ५६ लाखांचे सोन्याचे, तर ५५ लाखांचे चांदीचे दागिने आहेत. शाहू छत्रपतींच्या नावावरील वाहनांची किंमत ६ कोटी आहे. यात १९३६ ते १९६२ च्या २ व्हिनटेज मर्सिडीज कार, दोन मर्सिडीज, दोन टोयाटो, इनोव्हा, महिंद्रा थार याच वाहनांचा समावेश आहे. १२२ कोटी ८८ लाख इतक्या किंमतीची शेतजमीन त्यांच्या नावावर आहे. तर, पत्नी याज्ञसेनी यांच्या नावावर सात कोटी ५२ लाख रुपयांची शेतजमीन आहे.

Udayanraje Bhosale And  Shahu Chhatrapati  Maharaj Property
Kolhapur Loksabha: छत्रपती कुटुंबाने साजेसे काम केले नाही; शाहू महाराजांचे खरे वारसदार समरजित घाटगे.. विरेंद्र मंडलिकांचे विधान!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com