Loksabha Election: महादेव जानकरांना घरातून विरोध, पुतणे स्वरुप जानकरही लोकसभेच्या रिंगणात उतरणार; भाजपची डोकेदुखी वाढणार?

Maharashtra Politics News: महादेव जानकर यांचे पुतणे स्वरुप जानकर यांनी माढा मतदार संघातून लोकसभा लढवणार असल्याचे सांगितले आहे. माढ्यातून स्वरुप जानकर महायुतीच्या उमेदवाराला आव्हान देणार आहेत.
Maharashtra Politics News:
Maharashtra Politics News: Saamtv

सागर आव्हाड, पुणे|ता. ७ मार्च २०२४

Mahadev Jankar Vs Swarup Jankar:

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. एकीकडे परभणीमधून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. अशातच आता जानकर कुटुंबामध्येही फूट पडल्याचे दिसत असून महादेव जानकर यांचे पुतणे स्वरुप जानकर यांनी माढा मतदार संघातून लोकसभा लढवणार असल्याचे सांगितले आहे. माढ्यातून स्वरुप जानकर महायुतीच्या उमेदवाराला आव्हान देणार आहेत. (Maharashtra Loksabha Election 2024)

गेल्या काही दिवसांपासून रासपचे महादेव जानकर (Mahadev Jankar) आणि त्यांचे पुतणे स्वरुप जानकर यांच्यामध्ये संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. महादेव जानकर यांच्यावर नाराज होत स्वरुप जानकर यांनी लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. महादेव जानकर यांनी माढ्यातून लोकसभा लढावी, असा स्वरुप जानकर यांचा आग्रह होता.

मात्र महादेव जानकर यांनी महायुतीमधून परभणी लोकसभेतून लढण्याचा निर्णय घेतला. माढा मतदारसंघात विजय मिळण्याची शक्यता असताना महादेव जानकर यांनी परभणीची निवड केली. त्यामुळे स्वरुप जानकर (Swarup Jankar) यांनी नाराजी दर्शवली आहे.

Maharashtra Politics News:
Maharashtra Politics: मला मोदीजींनी सांगितलं लोकसभा नाही, तर बूथ जिंकायचा आहे; देवेंद्र फडणवीस

भाजपच्या दबावापुढे झुकत त्यांनी महायुतीकडून परभणीची उमेदवारी स्वीकारल्याचे स्वरूप जानकर यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सोयीचे राजकारण करणाऱ्या भाजपला धडा शिकवण्यासाठी स्वरूप यांनी माढ्यातून महायुतीच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. १४ एप्रिल रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तेव्हा कोणत्या पक्षाकडून लढणार हे जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Politics News:
Crime News: मित्रावरच केला अनैसर्गिक अत्याचार, बुलढाण्यातील खळबळजनक घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com